situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News 03 June 2025 : ट्रेडिंगमध्ये अधिक नफा मिळेल असे सांगून १७.५ लाखांची ऑनलाईन फसवणूक

Published On:

Team MyPuneCity – एका ५० वर्षीय इसमाने ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये भरघोस नफा मिळेल असे सांगून धनकवडी येथील व्यक्तीची तब्बल १७ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली ( Pune Crime News 03 June 2025) आहे.

दि. ५ मे ते ७ मे २०२५ या कालावधीत फिर्यादी यांच्याशी आरोपीने संपर्क साधून, मोबाईल आणि लिंकच्या माध्यमातून त्यांना ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यात अधिक नफा मिळेल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला आणि हळूहळू १७.५ लाख रुपये घेतले. मात्र नंतर कोणताही नफा मिळाला नाही व आरोपीचा संपर्कही तुटला.

या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती चव्हाण करत आहेत.


लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांचे सोन्याचे दागिने कपाटातून चोरीला ( Pune Crime News 03 June 2025)

लग्नकार्यासाठी पुण्यात आलेल्या पाहुण्यांचे १.६४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने कपाटातून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.

शुक्रवार पेठेतील शंकरकृपा अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर ही चोरी दि. १८ मे ते २० मे २०२५ दरम्यान घडली. फिर्यादी महिलेच्या मैत्रिणी आणि बहिणीचे दागिने त्यांनी कपाटातील लॉकरमध्ये ठेवले होते. मात्र अज्ञात इसमाने चावी घेऊन कपाट उघडले आणि दागिने चोरून नेले.

खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करत आहेत.


दुचाकीस्वारांनी ५३ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ९० हजारांचे गंठण ओढून लंपास ( Pune Crime News 03 June 2025)

दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी एका ५३ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण हिसकावून चोरून नेल्याची घटना उरुळी देवाची परिसरात घडली.

ही घटना दि. १ जून २०२५ रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास धनगरवस्ती रोडवरील सातव बिल्डिंगजवळ घडली. फिर्यादी पायी जात असताना पाठीमागून आलेल्या दोघांनी अचानक गळ्यातील गंठण हिसकावून पलायन केले.

फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक महेश नलावडे पुढील तपास करत आहेत.


बंद फ्लॅटचे कुलूप तोडून २.२२ लाखांचा ऐवज लंपास ( Pune Crime News 03 June 2025)

लोकमान्य नगरमधील जॉगिंग पार्कजवळील एका बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून २.२२ लाख रुपयांचे रोख व दागिने चोरीस गेले आहेत.

ही घटना २ जून २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. फिर्यादी व्यक्ती घर कुलूप लावून बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी कपाटातून २५ हजार रुपयांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २.२२ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नरवडे करत आहेत.


रिक्षामधून आलेल्या दोघांकडून युवकावर हल्ला; मोबाईल व रोख रक्कम लंपास ( Pune Crime News 03 June 2025)

काळेपडळ येथील रेल्वे बोगद्याजवळ एका युवकावर रिक्षामधून आलेल्या दोघांनी अचानक हल्ला करून मोबाईल व रोख रक्कम हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली.

ही घटना दि. १ जून २०२५ रोजी संध्याकाळी ७ ते ७.३० दरम्यान घडली. फिर्यादी हे त्यांच्या मोटरसायकलजवळ मित्राची वाट पाहत थांबले होते. तेव्हा दोघे रिक्षातून येऊन त्यांनी फिर्यादीच्या पॅंटच्या खिशातील मोबाईल फोन व २०० रुपये रोख हिसकावले. त्यानंतर जवळ उभ्या असलेल्या दुसऱ्या इसमालाही मारहाण करून त्याच्या खिशातील २५० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

या जबरी चोरीचा तपास काळेपडळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गुरय करत आहेत.


पीएमपीएल बसच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे पादचारी ठार ( Pune Crime News 03 June 2025)

पीएमपीएल बसचा चालक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात बस चालवत असताना, समोरून रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास जोरदार धडक दिली. या अपघातात ४७ वर्षीय सुमेरसिंह तेकाम यांचा मृत्यू झाला.

ही घटना १ जून २०२५ रोजी रात्री ८.२० वाजता सम्राट हॉटेलसमोर, पुणे रेल्वे स्टेशन ईस्ट गेटजवळ घडली. सुमेरसिंह तेकाम हे बालाघाट, मध्यप्रदेश येथील रहिवासी होते.

या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खोसे करीत आहेत.

Follow Us On