Team My Pune City – पुण्यातील चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंधाराचा फायदा घेत स्थानिकांमध्ये दहशत माजवणाऱ्या गुंड टोळीवर पोलिसांनी कारवाई करत नऊ जणांना अटक केली आहे. ही कारवाई 28 जून रोजी द पहाटे करण्यात आली.
प्रतीक सुनील कदम (वय 26), आमिर अल्लाउद्दीन शेख (वय 28), अतुल श्याम चव्हाण (वय 27),. रॉबिन दिनेश साळवे (वय 26), समीर अल्लाउद्दीन शेख (वय 25),जय सुनील घेंगट (वय 21), अभिषेक अरुण आवळे (वय 24) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणाने तक्रार केली होती की काही गुंडांनी त्याच्यावर कोयत्याने आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. तसेच परिसरात दहशत पसरवत नागरिकांमध्ये भीती निर्माण केली होती.यावरून चतुःश्रृंगी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
त्यांच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा,तीन कोयते, एक चारचाकी, 2 दुचाकी असा एकूण 7 लाख 60 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी, दोन चारचाकी आणि दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
ही कारवाई चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम, पोलिस निरीक्षक गुन्हे अश्विनी ननवरे, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अनिकेत पोटे,पोलिस अंमलदार श्रीकांत वाघवले , बाबूलाल तांदळे, इरफान मोमिन, बाबासाहेब दांगडे, श्रीधर शिर्के, महेंद्र वायकर, वाघेश कांबळे, सूरज खाडे यांनी केली
पोलिसांकडून या भागात पुन्हा अशा घटनांचा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी गस्त आणि गुप्त माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.