विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, छायाचित्रांचे प्रदर्शन
संवाद, पुणे, वृद्धी रिॲलिटी, अस्तित्व फाऊंडेशनचा उपक्रम
Team My Pune City -संवाद, पुणे, वृद्धी रिॲलिटी, अस्तित्व फाऊंडेशन यांच्या(Pune) संयुक्त विद्यमाने आयोजित बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नाचून नाही, तर वाचून गणेशोत्सव साजरा करा’ हे विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्यासाठी शालेय स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात आले.
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी साकारलेल्या (Pune)पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे, चित्रांचे, विविध छायाचित्रांचे प्रदर्शन दि. 28 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत भरविण्यात येणार आहे, अशी माहिती संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी आज (दि. 25 ऑगस्ट) पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी वृद्धी रिॲलिटीचे संचालक अमोल शहा, अस्तित्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. राजश्री जायभाये उपस्थित होते.
Ajit Pawa: पिंपरी-चिंचवडमध्ये होणार नाट्य संकुल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
Nutan Maharashtra Engineering : आधुनिक उद्योगांवर आर्टिफिशियल इंटेलिजंसचा सकारात्मक परिणाम – डॉ. दीपक शिकारपूर
‘नाचून नाही, तर वाचून गणेशोत्सव साजरा करा’ या अभिनव संकल्पनेतून बाल व कुमार वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कला व संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात काव्यवाचन, नाट्यछटा सादरीकरण, कथाकथन, रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाविषयी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी दोन शाळांमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कला व संस्कृती महोत्सवात पुण्यातील जवळपास पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचे, रंगभरण स्पर्धेतील चित्रांचे तसेच श्रीनिवास अरविंद पतके यांच्या गणेशोत्सवातील छायाचित्रांचे प्रदर्शन दि. 28 ते दि. 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत यशवंतराव चव्हाण कला दालनात भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन दि. 28 रोजी सकाळी 10 वाजता बालसाहित्यकार ल. म. कडू यांच्या हस्ते होणार आहे. वृद्धी रिॲलिटीचे संचालक अमोल शहा, अस्तित्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. राजश्री जायभाने यांची प्रमुख उपस्थिती असेल. शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांची अंतिम फेरी, प्रदर्शनाचा समारोप समारंभ दि. 31 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. समारोप समारंभ सायंकाळी 5 वाजता बालसाहित्यकार राजीव तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
Pune: बकोरी रोडच्या दुरुस्तीबाबत नागरिक आक्रमक, रस्त्यावर मांडला ठिय्या आंदोलन
पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल वैशिष्ट्यपूर्ण ठरावा यासाठी मुले तसेच पालकांसाठी फोटो कॉर्नर, गाणी, कवितांचे रेकॉर्डिंग करण्यासाची, शुभेच्छा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.