Team MyPuneCity – कोंढवा परिसरात एका इसमाचा डोक्यात दगड मारून खून केल्याची धक्कादायक घटना ११ मे रोजी घडली. मयत सुभाष रघुवीर परदेशी (वय ५४, रा. गोकुळनगर, गल्ली नं. ०३, कोंढवा बुद्रुक) यांचा निर्घृण खून करून पळून गेलेल्या दोघा आरोपींना कोंढवा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली.
कोंढवा पोलिसांना ज्योती हॉटेलजवळील मोकळ्या जागेत एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रऊफ शेख, नवनाथ जगताप, सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे सुभाष परदेशी यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या डोक्यावर दगडाने वार केल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाजवळ सापडलेल्या ओळखपत्रावरून ओळख पटली. त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, ते रात्री मित्रासोबत बाहेर गेले होते.
Daksh App : दक्ष ॲपच्या माध्यमातून उद्यान व्यवस्थापनात आणि कार्यक्षमतेत सुधारणा
तपासादरम्यान पोलीस अंमलदार विशाल मेमाणे यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हे उत्तमनगर येथील अहीरे गेट परिसरात लपले असल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत १) अभय जगन्नाथ कदम (वय २४, रा. भैरवनाथ आळी, कोंढवा खुर्द) आणि २) बादल शाम शेरकर (वय २४, रा. बधे चाळ, कोंढवा खुर्द) यांना ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी, पोलिसांनी विश्वासात घेतल्यावर खून केल्याची कबुली दिली.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे, सुभाष परदेशी यांनी आजारपणाच्या कारणावरून आरोपींकडून पाच लाख रुपये उधार घेतले होते. मात्र पैसे परत न दिल्याने आणि फसवणुकीच्या रागातून त्यांनी डोक्यात दगड मारून त्याचा खून केल्याचे उघड झाले.
Vadgaon Accident : वाढदिवसाच्या दिवशी अंत्यसंस्काराची दुर्दैवी वेळ; कर्तव्य बजावताना कंटेनरच्या धडकेत पोलीस अंमलदाराचा दुर्दैवी मृत्यू
या प्रकरणी सुभाष परदेशी यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून कोंढवा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे आणि सहायक पोलीस आयुक्त (वानवडी विभाग) धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, निरीक्षक रऊफ शेख, नवनाथ जगताप, सहा. निरीक्षक राकेश जाधव, तसेच पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, सतिश चव्हाण, लक्ष्मण होळकर, सुजित मदन, संतोष बनसुडे, सैफ पठाण, अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, विकास मरगळे यांचा समावेश होता.