फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
Team MyPuneCity – पुण्यातील भाजप पुणे शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरेंनी वरीष्ठ महिला पोलीस पदाधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात( Pune ) आला आहे.या घटनेमुळे पुणे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पुणे शहरातील शिवाजी रस्ता ते बाजीराव रस्त्यावरील प्रस्तावित भुयारी चौपदरी मार्गाच्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे 23 जून 2025 रोजी सकाळी 11 .30 वाजण्याच्या सुमारास आले होते.
Girish Prabhune : श्री गणेश मोफत वाचनालयात आज गिरीश प्रभुणे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार
त्या कार्यक्रमापूर्वी भाजपचे स्थानिक आमदार हेमंत रासने हे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चहा पिण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणापासून 100 मीटर अंतरावर गेले होते.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे येणार असल्याने पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ( Pune )ठेवला होता.
त्या बंदोबस्तील काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी हे देखील चहा पिण्यास गेले होते.त्यावेळी हेमंत रासने यांच्यासोबत असलेले सरचिटणीस प्रमोद कोंढरे यांनी वरीष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत घृणास्पद कृत्य केल्याची घटना घडली.त्यानंतर प्रमोद कोंढरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा फरासखाना पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला असून अधिक तपास ( Pune ) करण्यात येत आहे.
Maharashtra Brahmin Sabha: “मस्तानीबाईंचा अपमान सहन केला जाणार नाही!”; महाराष्ट्र ब्राह्मण सभेकडून तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा