Team My Pune City – डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला (Pune)जुन्या शहराशी जोडणारा पादचारी पूल उभारणीचे काम पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे भिडे पूल मंगळवारी (9 सप्टेंबर) मध्यरात्रीपासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुणे मेट्रो प्रशासनाने दिली आहे.
गणेशोत्सव काळात सार्वजनिक हालचालीसाठी अडथळा निर्माण होऊ नये म्हणून या पुलावरील काम काही दिवस थांबवण्यात आले होते. मात्र, आता बुधवारी (10 सप्टेंबर) पासून काम वेगाने सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुलावरील वाहतूक संपूर्णपणे बंद केली जाणार आहे.
वाहतुकीसाठी नदीकाठचा रस्ता खुला राहणार असून नागरिकांनी पर्यायी मार्ग म्हणून लाकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड पूल वापरावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Pune Ganeshotsav : पुण्यात साडे सहा लाख गणेशमूर्तींचे विसर्जन; 876 टन निर्माल्य संकलन, मात्र मूर्ती दानात घट
MLA Sunil Shelke : टाकवे बु., फळणे, बेलज परिसरात आमदार सुनील शेळके यांचा “जनसंवाद” अभियान दौरा
भिडे पुलावर सुरु होणारे पादचारी पूल बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नारायण पेठ, शनिवारी पेठ, लक्ष्मी रोड परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना डेक्कन मेट्रो स्थानकाला थेट पोहोचण्यासाठी मोठी सुविधा होणार आहे. “थोड्या काळाच्या गैरसोयीमुळे दीर्घकालीन सोय आणि सुरक्षितता वाढेल. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,” असे मेट्रो अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.