Team MyPuneCity – श्री भगवंत महोत्सव मंडळ पुणे यांनी आयोजित केलेल्या भगवंत महोत्सवास पुणे येथील भगवंत भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवून अक्षरशः भगवंत महोत्सव गाजवला.

पुणे येथे स्थायिक झालेल्या बार्शीकरांसाठी व पुण्यनगरीमध्ये श्री भगवंताचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुणे येथील सारसबाग मध्ये हे भगवंत महोत्सवाचे आयोजन केलेले होते. पहाटे पाच ते सहा हरिभाऊ करंदीकर यांचे कीर्तन होऊन सकाळी सहा वाजता गुलाल व फुले उधळून भगवंत प्रकटोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर बार्शीचे प्रसिद्ध गायक श्री सुनील बडवे यांनी मराठी व हिंदी भक्ती गीते गाऊन कार्यक्रमांमध्ये भक्तीपूर्ण वातावरण निर्माण केले. त्यानंतर विष्णू याग व विष्णुसहस्त्रनामाचे पठण झाले. विष्णू यागाचे यजमानपद अध्यक्ष श्री ओंकार एकशिंगे, जयंत देशपांडे व शकुंतला येळई यांनी भूषवले तर श्री अशोक कुलकर्णी गुरुजी हडपसर यांनी व त्यांच्या ब्रह्मवृंद टीमने श्री विष्णू यागाचे अत्यंत उत्कृष्ट असे नियोजन केले. दुपारी साडेबारा वाजता पूर्णाहुती होऊन यागाची सांगता झाली. त्यानंतर अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणावर श्री भगवंतास महा नैवेद्य अर्पण करून महाआरती करण्यात आली. दुपारी साडेबारा ते चार वाजेपर्यंत महाप्रसादाचा सुमारे 600 भगवंत भक्तांनी लाभ घेतला. दुपारी तीन ते चार यावेळी साईप्रसाद भजनी मंडळ कोथरूड यांचे भजन संपन्न झाले. हे भजन चालू असतानाच श्री भगवंत महोत्सवावर वरुण राजाने कृपा केली, पावसाच्या सरी आल्याने सर्वांची धांदल उडाली परंतु सारसबागेमधील गणपती मंदिरात पुन्हा त्याच उत्साहाने भजनी मंडळाने भजन संपन्न केले. पाऊस आल्यामुळे नियोजित असलेला रॉक ऑन म्युझिकल चा अभंगवाणी हा कार्यक्रम सारसबागेतील गणपती मंदिराच्या पाठीमागील वरच्या हॉलवर करण्यात आला.
Talegaon Crime News : अवैध दारू विक्री करणाऱ्यास अटक; १९२० रुपयांची दारू जप्त


या कार्यक्रमास भगवंत भक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास 1000 भगवंत भक्तांनी श्री भगवंताच्या पादुकांचे दर्शन घेतले. बार्शीतील योगेश अग्रवाल यांच्या तर्फे भगवंताचा प्रसाद म्हणून पेढ्याचे वाटप करण्यात आले. चारुशीला पानगावकर यांनी कैरीच्या पन्हे वाटले, तसेच श्री भगवंत महोत्सव मंडळ तर्फे बुंदीची पाकिटे, फोटो व गळ्यातील पंचा प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला. पुण्यातील श्री भगवंत महोत्सव पार पाडण्याकरता मंडळाचे अध्यक्ष श्री ओंकार एकशिंगे उपाध्यक्ष अरुण उन्हाळे सचिव कैलास बडवे खजिनदार देवदत्त मोरे कार्याध्यक्ष प्रवीण शिरशीकर प्रमुख विश्वस्त सुनंदा परंडकर, संजय जगदाळे, प्रशांत भैय्या जाधव, उज्वला धर्माधिकारी, चिन्मय कुलकर्णी, सुनिता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
Maharashtra : भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर
श्री भगवंत महोत्सव मंडळ पुणे यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे भगवंत भक्तांनी देणगी स्वरूपात रक्कम देऊन मंडळाच्या या कार्याला हातभार लावला आहे.