या पार्श्वभूमीवर, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले की, “अशा प्रखर बीम लाईट व लेझर बीम लाईटमुळे वैमानिकांचे डोळे दिपून जाऊ शकतात आणि त्यामुळे गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि म्हणूनच हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.”
IPL Match : भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्थगित
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये विशेष पोलीस महानिरीक्षक यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि याच कलमान्वये पोलीस सह आयुक्तांना हे अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यानुसार, लोहगाव विमानतळाच्या १५ किलोमीटरच्या परिघात आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही व्यक्तीस किंवा कार्यक्रम आयोजकास आकाशात प्रखर बीम लाईट व लेझर बीम लाईट सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार शिक्षेस पात्र ठरवले जाईल, असेही आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
पुणे शहर पोलिसांनी नागरिकांना या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून संभाव्य विमान अपघात टाळता येतील आणि हवाई वाहतूक सुरक्षित राहू शकेल. हा निर्णय विमान प्रवाशांच्या आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.



















