Team MyPuneCity -कला क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) उपयुक्त आहे, परंतु कलाकारांनी आपल्या कलेपासून दूर जाऊ नये, असे आवाहन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तज्ज्ञ, लेखक डॉ. अमेय पांगारकर यांनी केले.
संवाद, पुणे, हाऊस ऑफ सक्सेस, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि पुणे विद्यार्थी गृह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट’ या उपक्रमाअंतर्गत ‘कला आणि करिअर’ या विषयावरील प्रदर्शनी आणि मार्गदर्शन सत्रांचे शिवाजीनगरमधील बालगंधर्व कला दालन येथे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवसाची (दि. 14) सुरुवात ‘कला करियर आणि एआय टूल्स’ या विषयावर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तज्ज्ञ, लेखक अमेय पांगारकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजीतर्फे आयोजन करण्यात आले होते. पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक सुनील रेडेकर, पुणे विद्यार्थी गृह इंजिनिअरिंग महाविद्यालयातील एआय व डाटा सायन्स प्रमुख डॉ. मीनाक्षी अत्रे यांचा सहभाग होता.
Alandi : आळंदीतील रस्त्यावरील दिव्यांच्या खांबावर लावलेल्या बॅनरमुळे धोका

प्रत्येक पिढीतील व्यक्तींना कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्वीकार करता आला पाहिजे, परंतु आपली विचार करण्याची क्षमता गमावता काम नये असे आग्रही मत नोंदवून डॉ. अमेय पांगारकर पुढे म्हणाले, आज समाजात गुगल आम्हाला आमच्यापेक्षा जास्त ओळखतो असा समज समजात रूढ होत आहे. माणसाने जणू विचार करण्याची क्षमताच आऊटसोर्स केली आहे, हे मात्र मानवासाठी घातक आहे. एआय हे टूल आहे, त्यावर न विसंबता त्याचा वापर माणसानेच करायचा आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहे. कला क्षेत्रात एआयद्वारे झालेली क्रांतीची माहिती डॉ. पांगारकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून दाखविली.
प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगविषयी माहिती देताना डॉ. मिनाक्षी अत्रे यांनी भाषा, संगीत, गणिती ज्ञान, नृत्य, व्यक्तीचे अंतरंग, बाह्यरंग, बोलीभाषा, ज्ञानाचे सबलीकरण याविषयी सविस्तर माहिती देऊन एआयचा दैनंदिन जीवनात वापर करताना लागणाऱ्या उपयुक्त ॲप्सविषयी उपस्थितांना अवगत केले.
पुणे विद्यार्थी गृहाच्या कार्याविषयी सुनील रेडेकर यांनी माहिती दिली.





















