Team My Pune City – पुणे जिल्हयातील खेडशिवापूर टोल प्लाझा, (Pune)पाटस टोल प्लाझा, सरडेवाडी टोल प्लाझा व चालकवाडी टोल प्लाझा वर अव्यवसायिक (कार/जीप/व्हॅन) वाहनांसाठी, प्रवाशांसाठी वार्षिक टोल (फास्टॅग) पास सुरू होत असल्याचे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांनी कळविले आहे.
ही योजना फक्त अव्यवसायिक (कार/जीप/व्हॅन) वाहनांसाठी व प्रवाशांसाठी असणार आहे. वार्षिक टोल (फास्टॅग) पासची वैधता १ वर्ष किंवा २०० एकेरी वाहनांच्या फेऱ्यांसाठी यापैकी जे आधी होईल ते लागू राहील. फक्त राष्ट्रीय महामार्ग व राष्ट्रीय दुतगती महामार्गावरील टोल प्लाझांसाठी वैध असून, वार्षिक टोल (फास्टॅग) पासची किंमत फक्त तीन हजार रुपये इतकी राहील.
Lonavala Rain : लोणावळ्यात मुसळधार पाऊस; पुढील ४८ तास रेड अलर्ट
वार्षिक टोल पास (फास्टॅग) मिळविण्यासाठी तसेच सक्रियता आणि नूतनीकरणासाठी राजमार्ग यात्रा मोबाईल अॅपवर तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.