situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत इंदिरा अत्रे बालसाहित्यकार पुरस्कारांची घोषणा

Published On:

डॉ. शंतनू अभ्यंकर (मरणोत्तर), राजू तांबे, चंद्रशेखर जोशी,  फारुक काझी व चंद्रमोहन कुलकर्णी, वर्षा चौगुले, संजीवनी बोकील पुरस्काराचे मानकरी

‌‘शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी’, ‘डेंजरस झिरो ग्राउंड प्लेट’, ‘कहाणी ‘वंदे मातरम्’ची’,  ‌‘गंमत शब्दांची!’ व ‌‘गोष्टींतून कबीर’ या बाल-कुमार पुस्तकांची निवड

Team My Pune City –स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‘इंदिरा अत्रे बालसाहित्य’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली(Pune) असून डॉ. शंतनू अभ्यंकर (मरणोत्तर), राजीव तांबे, चंद्रशेखर जोशी, वर्षा चौगुले, संजीवनी बोकील यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष असून २०२४साली प्रसिद्ध झालेल्या डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या ‌‘शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी’ या किशोर-कुमारवयीन गटासाठी लिहिलेल्या कादंबरीला रुपये पाच हजार, राजीव तांबे यांच्या ‌‘डेंजरस झिरो ग्राउंड प्लेट’ या बाल साहित्यास रुपये तीन हजार तर मिलिंद सबनीस लिखित ‌‘कहानी वंदे मातरम्’ची या पुस्तकाच्या मुखपृष्ठ तसेच पुस्तकातील चित्रांसाठी चंद्रशेखर जोशी यांना दोन हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. तसेच विशेष उल्लेखनीय पुस्तक म्हणून वर्षा चौगुले यांच्या ‘गंमत शब्दांची’ तर संजीवनी बोकील यांच्या ‘गोष्टीतून कबीर’ या पुस्तकास प्रत्येकी एक हजार रुपये पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Chinchwad: चिंचवड येथील श्री मंगलमूर्तीची भाद्रपद यात्रा रविवारपासून

Vadgaon Maval: वारकरी नेेतृत्व गुण विकास कार्यकर्ता निवासी शिबीराची उत्साहात सांगता

पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सोमवार पेठेतील दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण ज्येष्ठ साहित्यिक व इतिहास संशोधक, समीक्षक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी., पुरस्कार संयोजन समिती प्रमुख प्रसाद भडसावळे व व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश वसंत गायकवाड यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या मातोश्री श्रीमती इंदिराबाई अत्रे या बालसाहित्यिका म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०२३ पासून मराठीतील बालसाहित्यकाराला पुरस्कृत करण्याचा मानस डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केला. त्यासाठी दरवर्षी प्रकाशित उत्तम बालसाहित्यकृती साकारणाऱ्या लेखकांना पुरस्कार देण्यात येतात. कार्यक्रमाचे संयोजन ठाणे येथील प्रकाशन संस्था व्यास क्रिएशन्स व दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी करणार आहे.

श्रीमती इंदिराबाई या एक शिक्षिका म्हणूनच नाही तर बालसाहित्यकार म्हणूनही ओळखल्या जात. त्यांनी आपल्या लेखनातून मुलांना संकारक्षमता व गुणग्राहकताही शिकविली. आजच्या काळातील अशाच एखाद्या कळकळीच्या बालसाहित्यकारांचा सन्मान व्हावा, हा या पुरस्काराचा उद्देश असल्याचे दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजीव ब्रह्मे यांनी सांगितले.

Follow Us On