Team My Pune City –लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक, विश्वासघात आणि जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या आलोक अजयकुमार पुरोहित (वय ४३, रा. एफ-१०० मेजर शैतानसिंग कॉलनी, शास्त्रीनगर, जयपूर) या आरोपीला वाकड पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेनं दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार आरोपी आलोक पुरोहित याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपी आलोक पुरोहित हा विवाहित असूनसुद्धा त्याने ‘Jeevansathi.com’, ‘Shaadi.com’, ‘IITIMShaadi.com’ यांसारख्या विवाह वेबसाईटवर स्वतःला अविवाहित दाखवून वेगवेगळ्या महिलांशी ओळखी वाढवल्या. त्याने पुण्यातील घटस्फोटीत महिलेशी संपर्क साधत लग्नाचे आमिष दाखवले आणि तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पुण्यात येऊन त्या महिलेशी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.
याव्यतिरिक्त आरोपीने पीडितेचे अश्लील फोटो व व्हिडिओ तयार करून तिला धमकावले. “तक्रार केल्यास सोशल मीडियावर फोटो टाकीन,” अशी धमकी देत तो तिला सतत ब्लॅकमेल करत होता. तपासादरम्यान पोलिसांना आलोक पुरोहित विवाहित असल्याचे आणि त्याने अशाच प्रकारे इतर काही महिलांचीही फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
Pimpri Businessman fraud : उच्च परताव्याचे आमिष दाखवून पिंपरीतील व्यावसायिकाची ३७ लाखांची फसवणूक; चतुःश्रृंगी पोलिसांत गुन्हा दाखल
Vadgaon Maval: वारंगवाडी मध्ये किल्ले बनविण्याची स्पर्धा संपन्न
आरोपीस दिनांक ७ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे अटक करण्यात आली असून सध्या त्याच्याकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ या मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर व पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलिसांकडून आरोपीची सखोल चौकशी सुरू असून, अशा फसवणुकीचा बळी पडलेल्या इतर महिलांनाही पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



















