situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Airport: पुणे विमानतळावर ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी; तपासानंतर अफवा असल्याचे उघड

Published On:
pune

Team My Pune City – पुणे विमानतळावर मंगळवारी (Pune Airport)(दि.23 सप्टेंबर) रात्री ई-मेलद्वारे आलेल्या बॉम्बस्फोटाच्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणेत एकच खळबळ उडाली. चेन्नईहून येणाऱ्या एका खाजगी विमानात आरडीएक्सवर आधारित स्फोटक यंत्रणा (IED) असल्याचा दावा या ई-मेलमध्ये करण्यात आला होता. “हे विमान पुण्यात उतरण्यापूर्वीच उडवून दिले जाईल,” असा उल्लेख मेलमध्ये असल्याने सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.

ही धमकीची ई-मेल रात्री सुमारे ९.४० वाजता प्राप्त झाली. त्यानंतर तातडीने विमानतळावर अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या. विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गोविंद जाधव यांनी सांगितले की, “या मेलमुळे स्वाभाविकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु बॉम्ब शोध पथक व नाशक पथकाने विमानतळ परिसरासह संबंधित विमानाची सखोल तपासणी केली. तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. सदर धमकी ही केवळ अफवा असल्याचे निष्पन्न झाले आहे.”

Maval: मावळ तालुक्यात देवघरमध्ये गट नं. २५० वर अनधिकृत बंगल्यांचा धडाकेबाज उद्योग; पीएमआरडीएकडे साधा परवानगीचा प्रस्तावही नाही!

Pune :सहकारनगर पोलीस ठाण्यात जप्त 16 बिनधनी दुचाकी; वाहन मालकांना सात दिवसांत संपर्क साधण्याचे आवाहन

या घटनेनंतर बुधवारी (दि.24) संध्याकाळी एका एअरलाईन कर्मचाऱ्याने विमानतळ पोलिसांकडे औपचारिक तक्रार नोंदवली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे विमानतळ संचालक संतोष धोके यांनी सांगितले की, “धमकीच्या ई-मेलनंतर सर्व विमानांच्या दुय्यम तपासण्या सुरू करण्यात आल्या. सीआयएसएफला सामान तपासणी प्रक्रियेत अधिक दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्व एअरलाईन्सना प्रवाशांच्या हालचालींबाबत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”

धमकीच्या ई-मेलमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तथापि, सखोल तपासानंतर ती खोटी असल्याचे स्पष्ट झाल्याने विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरळीत करण्यात आले. प्रवाशांना किंवा कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण भासली नाही.

Follow Us On