Team My Pune City – पुणे शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर (Pune)अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. यासाठी एआय कॅमेरे बसविलेल्या विशेष वाहनांचा प्रायोगिक प्रकल्प (‘प्रुफ ऑफ कन्सेप्ट’ – POC) मंगळवारपासून सुरू करण्यात आला असून, सुरुवातीला जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्त्यावर या वाहनांची गस्त सुरू झाली आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, तसेच सहायक आयुक्त नंदिनी वाग्याणी-पराजे उपस्थित होते. एआय कॅमेरे असलेले हे वाहन गस्तीदरम्यान बेशिस्त वाहनचालकांचे थेट फोटो व व्हिडिओ टिपून त्यांचा तपशील तात्काळ वाहतूक नियंत्रण केंद्राकडे पाठवणार आहे. नियमभंगाची नोंद होताच संबंधित वाहनचालकांना दंडाची ऑनलाइन पावती (ई-चलन) व दंड रक्कमेची माहिती तत्काळ मोबाइल संदेशाद्वारे मिळणार आहे.
Talegaon Dabhade: नूतन अभियांत्रिकीमध्ये उद्योजकता विकास सत्राचे आयोजन
PMPML: रक्षाबंधन सणाच्या 4 दिवसाच्या कालावधीत पीएमपीएमएल ने कमावले तब्बल 10 कोटी
फर्ग्युसन रस्त्यावर गेल्या तीन महिन्यांत तब्बल ३,९४९ वाहनचालकांवर विविध वाहतूक नियमभंग प्रकरणांत कारवाई झाली आहे. या पार्श्वभूमीवर, एआय कॅमेरे बसविलेले पोलिस वाहन सुरुवातीला जंगली महाराज आणि फर्ग्युसन रस्त्यावरच कार्यरत राहणार असून, पुढील काळात अशा वाहनांची संख्या वाढविण्याची योजना आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील म्हणाले, “या तंत्रज्ञानामुळे रस्त्यावरचे वादविवाद टळतील, कारवाई अधिक प्रभावी आणि पारदर्शक होईल. बेशिस्त वाहनचालकांवर तत्काळ कारवाई होऊन वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होईल.”