Team My Pune City -यॉडलिंगचा बादशहा आणि बहुगुणी कलाकार किशोर कुमार यांच्या ३८व्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या अनेक गीतांची जादू पुन्हा एकदा रसिकांना अनुभवायला मिळाली.
निमित्त होते पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना वाहिलेल्या सांगीतिक स्वरांजलीचे. अगर तुम ना होते या कार्यक्रमाचे आयोजन आज (दि. १३) पूना गेस्ट हाऊस येथे करण्यात आले होते. या कायर्क्रमात अजय राव व ॲड. रुचिरा गुरव यांनी किशोर कुमार यांची सदाबहार गीते सादर केली. अनेक दशके आपल्या सुरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या किशोर कुमार यांनी हिंदी चित्रपट सृष्टीवर आपल्या सुरांची मोहिनी पसरवली होती.
अगर तुम ना होते, रिमझिम गिरे सावन, हाल कैसा है जनाब का, ओ हंसिनी, नखरेवाली, जिंदगी के सफर में, कोरा कागज था ये मन मेरा, पन्नाकी तमन्ना, ओ मेरे दिल के चैन, आपकी आखों मे यांसह अनेक सुप्रसिद्ध गीते या प्रसंगी सादर करण्यात आली. हृदयाला स्पर्श करणारे शब्द, आणि जादूई आवाज याने रसिकांना मोहित केले. अनेक गाण्यांना वन्स मोअर देत तर अनेकदा गायकांच्या सुरात सूर मिसळत, टाळ्या आणि शिट्ट्यांनी दाद देत हा अनोखा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. रत्ना दहीवेलकर यांनी कार्यक्रमाचे खुमासदार शैलीत निवेदन केले.
Pune: दिवाळी अंक सर्जनशील लेखक तयार करणारी प्रयोगशाळा- प्रा. मिलिंद जोशी
कर्नल वसंत बल्लेवार, शरयू जोशी, व्हाईस ऑफ किशोर कुमार म्हणून ओळखले जाणारे गायक विजय केळकर व अनिल घाटगे, मेलडी मेकर्सचे अशोककुमार सराफ यांच्यासह पिंपरी-चिंचवड नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मंदार जोशी, डॉ. प्रसाद पिंपळखरे, प्रा. सविता केळकर, आनंद सराफ अशा अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावत कलाकारांना प्रोत्साहित केले.
कलाकरांचे स्वागत पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांनी केले. तर संयोजन अजित कुमठेकर यांचे होते.