मागील वर्षीचे सन्मानार्थी अभिनेता सुमीत राघवन आणि ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते होणार ओक यांचा सन्मान
Team MyPuneCity – निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच (Pune) यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले कृतज्ञता सन्मान यावर्षी प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असल्याचे बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे समीर बेलवलकर यांनी सांगितले .
येत्या शनिवार दिनांक ७ जून रोजी मयूर कॉलनी, कोथरूड येथील बालशिक्षण प्रशालेच्या एमईएस सभागृहात संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्काराचे मागील वर्षीचे सन्मानार्थी अभिनेता सुमीत राघवन आणि ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते सदर पुरस्कार ओक यांचा प्रदान करण्यात येईल. सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल. कार्यक्रमस्थळी काही जागा (Pune) या निमंत्रितांसाठी राखीव असतील, याची कृपया नोंद घ्यावी.
Pune : स्नेहल दामले यांना उद्धव कानडे स्मृती पुरस्कार
निळू फुले यांच्यासारख्या महान कलाकाराला आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने मागील तीन वर्षे पुण्यात हा कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात येत असून यंदा या सन्मान सोहळ्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. रोख रुपये २१ हजार, मानचिन्ह, गांधी टोपी आणि उपरणे असे या सन्मानाचे स्वरूप आहे. या आधी ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, सुमीत राघवन यांना या कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले होते हे विशेष.
कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना बेलवलकर संस्कृतिक मंचाचे अध्यक्ष समीर बेलवलकर म्हणाले, “निळू फुले यांसारख्या दिग्गज कलाकाराप्रती आदर व्यक्त करणे, यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देणे आणि नव्या पिढीला त्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने (Pune) आम्ही हा पुरस्काराचा उपक्रम राबवितो आहोत. प्रमुख पाहुण्यांपेक्षा मागील वर्षीच्या सन्मानार्थीने यावर्षीच्या सन्मानार्थीला सन्मानित करावे आणि ही परंपरा अशीच पुढे चालावी या कल्पनेने मागील वर्षीचे कृतज्ञता सन्मान सन्मानार्थी सुमीत राघवन यांच्या हस्ते आम्ही यावर्षी प्रसाद ओक यांचा सन्मान करीत आहोत. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले थत्ते हे देखील यावेळी उपस्थित असतीत.”
पुरस्कार वितरण समारंभानंतर प्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार राजेश दामले हे प्रसाद ओक यांची प्रकट मुलाखतही घेणार (Pune) आहेत.