Team MyPuneCity – महापालिकेच्या कचरा वाहतूक करणार्या डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना विश्रांतवाडी ( Pune Accident News) येथील एअरपोर्ट जवळील सावंत पेट्रोल पंपासमोरील चौकात मंगळवारी दुपारी तीन वाजता घडला.
एकता भरत पटेल (वय २३, रा. विद्यानगर, पिंपळे गुरव) असे मृ्त्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालक त्र्यंबक केरप्पा शेरखाने (वय ३८, रा. आंबेडकर वसाहत, ओैंध) याला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली.
Talegaon Dabhade : सासूचा खून करणाऱ्या सुनेला जन्मठेप; वडगाव मावळ सत्र न्यायालयाचा निर्णय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकता पटेल ही लोहगावमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकीस्वार एकता विश्रांतवाडीतून येरवडा कारागृहाकडे जाणार्या रस्त्याने निघाली होती. एअरपोर्ट जवळील सावंत पेट्रोल पंपासमोरील चौकात महापालिकेच्या कचरा वाहतूक करणार्या डंपरने दुचाकीस्वार एकताला धडक दिली. चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपरचालक शेरखाने याला अटक करण्यात आली ( Pune Accident News) आहे़.