अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद
Team MyPuneCity – पुणे शहरातील मार्केटयार्ड जवळील (Pune Accident News) गंगाधाम चौकातून दुचाकीवरून जाणार्या महिलेला ट्रकने चालकाने चिरडल्याची घटना घडली आहे.तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली असून या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
Kalewadi : राहत्या घरातून वृद्ध महिला बेपत्ता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गंगाधाम चौकातून सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी जगदीश पन्नालाल सोनी आणि पाठीमागे बसलेली महिला दिपाली युवराज सोनी या दुचाकीवरून जात होते.त्यावेळी पाठी मागून आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिली.
त्यामुळे त्या घटनेमध्ये दुचाकीच्या पाठी मागे बसलेल्या दिपाली सोनी यांच्या अंगावर चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.तर जगदीश सोनी हे जखमी झाल्याची घटना घडली असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या अपघात प्रकारणातील आरोपीला अटक करण्यात (Pune Accident News) आली असल्याचे त्यांनी सांगितले.