Team MyPuneCity – पुणे येथील भारतीय प्राणी संशोधन संस्था (झेडएसआय), पश्चिम प्रादेशिक केंद्रात त्यांच्या स्थापना दिनानिमित्त ‘जैवविविधता संवर्धन’ या विषयावर आधारित 110 तासांची हॅकाथॉन स्पर्धा अत्यंत यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेचा मुख्य उद्देश पर्यावरणीय समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी बहुवैषयिक दृष्टिकोन व तंत्रज्ञानाधिष्ठित उपायांना प्रोत्साहन देणे हा होता.
“दख्खन पठारातील जैवविविधता” या विषयावर आधारित या स्पर्धेत देशभरातील जीवशास्त्रज्ञ, डिझायनर, सॉफ्टवेअर विकसक, पर्यावरण अभ्यासक आणि संशोधकांनी सहभाग घेतला. स्पर्धक हैदराबाद, कोलकाता, ओडिशा आणि महाराष्ट्रातील नामवंत संस्थांमधून आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी, संशोधकांनी आणि नवोन्मेषी विचारधारेच्या तंत्रज्ञानप्रेमींनी आपली कल्पकता सादर केली.
हॅकाथॉनदरम्यान स्पर्धकांना मोबाईल अॅप्स, अल्गोरिदम्स, डेटा मॉडेल्स, प्रोटोटाइप्स किंवा धोरणात्मक प्रस्तावाच्या माध्यमातून जैवविविधतेचे संवर्धन व वन्यजीव निरीक्षणासाठी उपयुक्त असे सर्जनशील उपाय सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.
Baramati Rain News : बारामती, दौंड, इंदापूर भागात ढगफुटी सदृश पाऊस;नीरा डावा कालवा फुटल्यानं पाणी पालखी महामार्गापर्यंत आले
ही हॅकाथॉन स्पर्धा तीन टप्प्यांत राबविण्यात आली. पहिला टप्पा प्रादेशिक पातळीवर झाला, ज्यात विविध विषयांवरील प्रकल्प प्रादेशिक केंद्रांमध्ये सादर करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात प्रादेशिक स्तरावरून निवडलेल्या १६ सर्वोत्तम प्रकल्पांची सादरीकरणे पुणे येथील झेडएसआयच्या पश्चिम प्रादेशिक केंद्रात पार पडतील. तर अंतिम राष्ट्रीय टप्पा ३० जून २०२५ रोजी कोलकाता येथे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या अंतिम टप्प्यात तीन राष्ट्रीय विजेत्यांना गौरविण्यात येईल.
पुणे केंद्रातून विजयी ठरलेल्या टीम्समध्ये प्रथम क्रमांक पटकावला टीम ३ ने त्यामध्ये चैतन्य भोसले आणि प्रथमेश तापसे यांनी. द्वितीय क्रमांक मिळवला टीम २ च्या डॉ. अज़राज दहीहांडे यांनी, तर तृतीय क्रमांक पटकावला टीम ५ ने ज्यामध्ये डॉ. पी. आर. सुषमा, डॉ. मेहताब यासमीन आणि डॉ. हाजेरा सना यांचा समावेश होता. या विजेत्यांना राष्ट्रीय स्तर-२ च्या स्पर्धेत देशभरातील इतर प्रादेशिक केंद्रांच्या विजेत्यांसोबत पुणे येथे आपले प्रकल्प सादर करण्याची संधी मिळणार आहे.
झेडएसआय पश्चिम प्रादेशिक केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. बसुदेव त्रिपाठी म्हणाले, पुणे यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले. त्यांनी जैवविविधता संकटांवर उपाय शोधण्यासाठी बहुविषयक दृष्टिकोन किती आवश्यक आहे, हे अधोरेखित केले. हॅकाथॉनद्वारे संस्थेची वैज्ञानिक विचारसरणी, नवोन्मेषी दृष्टिकोन आणि निसर्गसंवर्धनाबद्दलची बांधिलकी स्पष्ट झाली आहे. ही स्पर्धा केवळ स्पर्धा न राहता जैवविविधतेच्या संवर्धनासाठी नव्या पिढीने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.






















