Team MyPuneCity –एका ३० वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना हांडेवाडी स्मशानभूमीजवळ उघडकीस आली आहे. अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झाले नसून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरुणाचे नाव हनीफ मुसा शेख (वय ३०, रा. कृष्णानगर, महमदवाडी, पुणे) असे आहे. त्यांच्या भावाने याबाबत फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मृतदेह ८ मे २०२५ पासून ९ मे २०२५ रात्रीपर्यंत काळात हांडेवाडी स्मशानभूमीजवळ टाकण्यात आला होता.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता, मृतदेहाजवळ मोठा दगड आढळून आला. शवविच्छेदन अहवालात मृताच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यावरून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. खून करून मृतदेह स्मशानभूमीजवळ फेकण्यात आल्याचे दिसून येते.
Dighi: दिघी मधून 13 किलो गांजा जप्त
पोलीस सध्या मृताच्या वैयक्तिक संबंधांबाबत चौकशी करत असून, तो कोणाच्या संपर्कात होता, कुठे गेला होता, आणि कोणाशी शत्रुत्व होते याचा तपास केला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल कॉल रेकॉर्ड्सचा अभ्यास केला जात आहे.
या खुनाबाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे हे पुढील तपास करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.