Team My Pune City – आगामी पुणे महापालिका (Pune)निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेमुळे राजकीय इच्छुक, माजी नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांमध्ये मोठा असंतोष उसळला आहे. नव्याने आखलेल्या हद्दी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांना अनुकूल असल्याच्या आरोपांनी जोर धरला असून, आतापर्यंत तब्बल 1 हजार 382 हरकती व सूचना दाखल झाल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ एका दिवसात 785 हरकती दाखल झाल्या आहेत. यावरून असंतोषाचे गांभीर्य स्पष्ट दिसून येते. विशेष म्हणजे, 41 प्रभागांपैकी 8 प्रभागांत एकही हरकत नोंदलेली नाही, तर काही प्रभागांत असामान्यरीत्या जास्त हरकती दाखल झाल्या आहेत. हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत 4 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.
प्रभागरचनेचा आढावा
Devendra Fadnavis : मी प्रत्येक समाजासाठी काम करत राहील-देवेंद्र फडणवीस
Sahara Old Age Home : गणेशोत्सवानिमित्त सहारा वृध्दाश्रमात हभप मोरे महाराज यांची किर्तन सेवा
आगामी PMC निवडणुकांत १६५ नगरसेवकांची निवड ४१ प्रभागांतून केली जाणार आहे. यापैकी ४० प्रभागांत प्रत्येकी ४ सदस्य असतील, तर प्रभाग क्र. ३८ (अंबेगाव-कात्रज) येथे ५ सदस्य असतील. सुरुवातीला ३४ गावे PMC च्या हद्दीत समाविष्ट करण्यात आली होती; मात्र उरळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेचे क्षेत्रफळ कमी झाले असून, त्याऐवजी नव्या प्रभागांची निर्मिती झाली आहे.
नेत्यांच्या आक्षेपाचे मुद्दे
माजी नगरसेवक व स्थानिक नेत्यांनी प्रभागरचनेत पुढील बाबींबाबत आक्षेप घेतले आहेत :
अनुकूल भागांचा समावेश आणि प्रतिकूल भागांचा बहिष्कार
मुख्य रस्त्याऐवजी लहान गल्ल्यांच्या आधारावर प्रभागांची आखणी
काही प्रभागांतील राजकीय संतुलन ढळेल असे मनमानी बदल
हरकत न आलेले प्रभाग
८ प्रभागांत एकही हरकत दाखल झालेली नाही. त्यामध्ये :
प्रभाग ५ : कळ्याणी नगर – वडगाव शेरी
प्रभाग १० : बावधन – भुसरी कॉलनी
प्रभाग १२ : छत्रपती शिवाजी नगर – मॉडेल कॉलनी
प्रभाग २५ : शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई
प्रभाग २९ : डेक्कन जिमखाना – हॅपी कॉलनी
प्रभाग ३० : कर्वेनगर – हिंजे होम कॉलनी
प्रभाग ३१ : मयूर कॉलनी – कोथरूड
प्रभाग ४० : कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी
सर्वाधिक हरकती असलेले प्रभाग
प्रभाग ३ विमाननगर-लोणीकंद : ३८१ हरकती
प्रभाग ३४ वडगाव बुद्रुक : २७८ हरकती
प्रभाग १५ मंजरी बुद्रुक-साडेसातारा नाळा : २२४ हरकती