Team My Pune City : पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी ३१ ऑक्टोबर मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते १३ नोव्हेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत (Prohibitory Orders) महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
सदर आदेशानुसार कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ, द्रव्य सोबत नेणे, दगड, शस्त्रे, तलवारी, भाले, सोटा, दंड, काठ्या, बंदूका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल (Prohibitory Orders) अशी कोणतीही वस्तू सोबत नेणे, कोणत्याही व्यक्तिच्या चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे-प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजवणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
सभ्यता व नितिमत्तेस धोका पोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल (Prohibitory Orders) अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे, कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेणे, मिरवणूका काढणे यांस प्रतिबंध करण्यात आला आहे.
हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तिंना तसेच ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे व त्याबाबत परवानगी आहे, (Prohibitory Orders) त्यांना लागू होणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असे आदेशात नमूद केले आहे.




















