Team MyPuneCity –लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे(Priya Marathe) निधन झाले आहे. वयाच्या केवळ 38 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. मात्र, उपचार सुरू असूनही अखेरीस त्यांना हा आजार जिंकता आला नाही. त्यांच्या निधनाने मराठीसह हिंदी कलाविश्वातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रिया मराठे या मालिकांमधून घराघरात पोहोचल्या होत्या. “या सुखांनो या”, “चार दिवस सासूचे”, “तु तिथे मी”, “तू… गीत गात आहे” यांसारख्या मराठी मालिकांबरोबरच “कसम से”, “पवित्र रिश्ता” आणि “बड़े अच्छे लगते हैं” यांसारख्या हिंदी मालिकांमधील त्यांच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. विशेषत: “पवित्र रिश्ता”मधील त्यांच्या भूमिकेमुळे त्या प्रत्येकाच्या लक्षात राहिल्या.
Gauri Avahan: गौरी आवाहन स्थापनेसाठी रविवार, ३१ ऑगस्ट रोजी ‘हे’ आहेत विशेष शुभमुहूर्त
अभिनेत्रीच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. अनेक सहकाऱ्यांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रियाचा आत्मविश्वास, अभिनय आणि त्यांच्या भूमिकेतली नैसर्गिकता ही कायमच प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियाच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया मीरा रोड येथील हिंदू स्मशानभूमी येथे पार पडणार आहे. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी आणि मालिकांसोबतच हिंदी मालिकांच्या दुनियेतही एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन झाले आहे. वयाच्या केवळ 38 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. मात्र, उपचार सुरू असूनही अखेरीस त्यांना हा आजार जिंकता आला नाही. त्यांच्या निधनाने मराठीसह हिंदी कलाविश्वातही हळहळ व्यक्त केली जात आहे.