Team My Pune City – परवानगी न घेता पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनवर प्री-वेडिंग फोटोशूट ( Pre-wedding photo shoot) करणाऱ्या जोडप्याला आणि त्यांच्या छायाचित्रकारांना मोठा दंड बसला आहे. ‘महामेट्रो’ प्रशासनाने या पाच जणांविरुद्ध कारवाई करत दंडात्मक आदेश जारी केले आहेत.
पुणे मेट्रोच्या नियमानुसार कोणत्याही खासगी किंवा व्यावसायिक चित्रीकरणासाठी ( Pre-wedding photo shoot) मेट्रोकडून पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य आहे. परवानगी घेताना चित्रीकरणाचा कालावधी, सहभागी व्यक्तींची संख्या, तसेच आवश्यक शुल्क यांचा तपशील देणे आवश्यक असते. मात्र, संबंधित जोडप्याने हे सर्व नियम धाब्यावर बसवून मंडई स्थानकात थेट फोटोशूट केले.
Suicide : एनडीए प्रवेशासाठी तयारी करणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या
मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, स्थानकावर वारंवार ( Pre-wedding photo shoot) उद्घोषणा करून फोटोशूट थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या, तरीही या जोडप्याने आणि फोटोग्राफरने चित्रीकरण सुरूच ठेवले. सार्वजनिक मालमत्तेच्या नियमांचे उल्लंघन आणि प्रशासनाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्यामुळे महामेट्रोकडून त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पुणे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले की, “मेट्रो ही सार्वजनिक मालमत्ता असून, तिचा कोणताही व्यावसायिक वापर नियमांच्या चौकटीतच केला जाऊ शकतो. परवानगीशिवाय अशा प्रकारे चित्रीकरण करणे गुन्हा मानला जातो.” नागरिकांनी अशा प्रकारच्या नियमभंगापासून दूर राहावे, असे आवाहनही करण्यात ( Pre-wedding photo shoot) आले.


















