Team MyPuneCity –संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट मध्ये काळे फासण्यात आले आहे.प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ही घटना घडली. शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं असल्याची माहिती आहे.
प्रवीण गायकवाड यांच्या अंगावरील कपडे फाडण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. कार्यकर्त्यांच्या राड्यामुळे अक्कलकोटमध्ये तणावपूर्व वातावरण होते.
Mahesh Landge:हिंजवडीच्या प्रश्नासंबंधी विभागीय आयुक्तांकडे बैठक
प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट दौऱ्यावर आले होते. यावेळी ते फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आले होते. प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक झाले होते. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राग पदाधिकाऱ्यांच्या मनात होता.
यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केले होते. आज प्रवीण गायकवाड अक्कलकोट येथे आले असता शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सत्काराच्या कार्यक्रमावेळी गायकवाड यांच्या चेहऱ्याला कार्यकर्त्यांनी काळे फासले.
शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासल्यानंतर प्रवीण गायकवाड हे कारमध्ये जाऊन बसले होते . पण शिवधर्म फाऊंडेशनचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी कारमध्ये घुसून गायकवाड यांना मारहाण केली.