Team My pune city –पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगर रचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांची अचानक बदली झाली आहे. त्यांची छत्रपती संभाजीनगर येथील वाहतूक व परिवहनच्या नगर रचना विभागाच्या उपसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश राज्याच्या नगर विकास विभागाचे सहसचिव सुबराव शिंदे यांनी काढले आहेत.
Sanatan Sanstha : सनातन संस्थेच्यावतीने देशभरात ७७ ठिकाणी, तर चिंचवड आणि तळेगाव येथे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ होणार !
गायकवाड हे महापालिकेत वादग्रस्त अधिकारी ठरले. वाकड येथील व्यापारी संकुलास टीडीआर देणे. तसेच, अनेक बांधकाम व्यावसायिकांना टीडीआरचा मोबदला देण्यावरून त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती.
Maval: शॉर्टसर्कीटच्या आगीत दोघे गंभीर भाजले, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू
महापालिकेच्या प्रारूप विकास आरखडा तसेच, चर्होली व चिखली येथील टीपी स्कीमवरून त्यांच्याविरोधात अनेक आंदोलन झाली. त्यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात महापालिका भवनासमोर तब्बल महिन्याभर आंदोलन झाले होते.