Team My Pune City – राज्यभरात गाजत असलेल्या हॉटेल पार्टी ( Pranjal Khewalkar) प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्याविरुद्ध आणखी अडचणी वाढल्या आहेत. एका महिलेने नुकतीच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यावरून डॉ. खेवलकर यांच्याविरुद्ध सायबर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पोलिसांनी तपास अधिक गतीमान केला आहे.
Alandi : माऊलींच्या सुवर्ण महोत्सवी जन्मवर्षा निमित्त उद्या आळंदीत सुवर्ण कलशारोहण सोहळा
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. खेवलकर यांनी खराडीतील एका हॉटेलमध्ये पार्टी ( Pranjal Khewalkar) आयोजित केली होती. या पार्टीत तरुणींना बोलावण्यात आले होते. या संदर्भात एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली होती. आयोगाने ही बाब गंभीरपणे घेत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
Vadgaon Maval : सामाजिक कार्यकर्ते अशोक घोजगे यांचे निधन
दरम्यान, सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणाऱ्या महिलेने धक्कादायक खुलासा केला आहे. तिच्या फिर्यादीनुसार, 2022 ते जून 2025 या कालावधीत डॉ. खेवलकर यांनी विविध हॉटेलमध्ये तिला बोलावून निर्वस्त्र अवस्थेतील छायाचित्रे काढली. फिर्यादीची ( Pranjal Khewalkar) संमती नसताना काढलेली ही छायाचित्रे गैरवापरासाठी वापरली जाऊ शकतात, अशी भीती महिलेने व्यक्त केली आहे.
या गंभीर तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी डॉ. खेवलकर यांच्याविरुद्ध ( Pranjal Khewalkar) भारतीय न्याय संहिता कलम 77 तसेच माहिती-तंत्रज्ञान कायदा 2000 कलम 66 (ई) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी डॉ. खेवलकर यांचा दुसरा मोबाइल, कॅमेरा, लॅपटॉप, तसेच संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज साठवणारा डीव्हीआर जप्त केला आहे. शिवाय या प्रकरणात सामील असलेल्या इतर सहा आरोपींचे मोबाइल व पेन ड्राईव्ह ताब्यात घेऊन तांत्रिक तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी सुरू असून, या प्रकरणातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता ( Pranjal Khewalkar) आहे.