Team My pune city – पुण्यातील ( Pranjal Khewalkar) खराडी परिसरातील उच्चभ्रू परिसरात शनिवारी रात्री छापेमारी करत पोलिसांनी एका रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. या पार्टीतून पोलिसांनी पाच पुरुषांसह दोन महिलांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर ( Pranjal Khewalkar ) यांचाही समावेश आहे. एका राजकीय नेत्याचा जावई अशाप्रकारे रेव्ह पार्टीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली .
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह आरोपींच्या रक्ताच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल समोर आला आहे. पोलिसांना ससून रुग्णालयाकडून अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनी दारुचे सेवन केल्याचं आढळून आलं ( Pranjal Khewalkar) आहे.
Rashi Bhavishya 28 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी दारू प्यायलं हे स्पष्ट झालं आहे. ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर आलीय. तर ड्रग्सचे सेवन के होतं का नाही हे एफएसएल अहवाल आल्यावर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, प्रांजल खेवलकर यानी ड्रग्जचं सेवन केलं नाही असं त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं ( Pranjal Khewalkar) होतं.