Team My Pune City – राज्यातील नागरिकांना दर्जेदार ( Prakash Abitkar ) आणि मोफत आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, रुग्णालयांनी उपचारानंतर केलेल्या दाव्यांचा (क्लेम) परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यास ती रक्कम त्याच महिन्यात अदा करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. तसेच अंगीकृत रुग्णालयांना 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी येथे आयोजित ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे – जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कार’ वितरण सोहळा आणि अंगीकृत रुग्णालय संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम राज्य आरोग्य हमी सोसायटी व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद जगताप, पद्मश्री पोपटराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
रुग्णालय दरवाढ व सुविधा सुधारणा लवकरच
. आबिटकर म्हणाले, “रुग्णालयांच्या मागणीनुसार लवकरच उपचार ( Prakash Abitkar ) पॅकेजमध्ये वाढ करण्यात येईल. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून मिळणाऱ्या निधीपैकी ८० टक्के रक्कम रुग्णालयांसाठी आणि २० टक्के राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीसाठी वापरली जाणार आहे. या निधीतून ५ लाखांपेक्षा अधिक खर्चाच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयांनी वापर करावा.”
राज्य शासनाकडून लवकरच १०८ क्रमांकाच्या २५० नवीन रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेकरिता उपलब्ध करून देण्यात येतील. या रुग्णवाहिका शासकीय तसेच योजनेशी संलग्न रुग्णालयांना देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Rashi Bhavishya 18 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
आयुष्मान कार्ड निर्मितीला गती
आयुष्मान भारत कार्ड तयार करणाऱ्या आशा कार्यकर्त्या, स्वस्त धान्य दुकान चालक, तसेच सेवा केंद्र चालकांना मिळणारी प्रोत्साहनपर रक्कम ५ रुपयांवरून ३० रुपये करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभर १०० टक्के आयुष्मान कार्ड निर्मितीला गती मिळेल, अशी अपेक्षा आबिटकर ( Prakash Abitkar ) यांनी व्यक्त केली.
त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्पष्ट निर्देश आहे की “आरोग्य सेवेत महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य ठरले पाहिजे.”
आरोग्य सेवावृत्तींचा गौरव
कार्यक्रमात अंगीकृत रुग्णालये, आरोग्य मित्र, आशा कार्यकर्त्या, स्वस्त धान्य दुकान चालक, आपले सरकार सेवा केंद्र चालक, तसेच योजना राबविणारे जिल्हा व गावपातळीवरील अधिकारी-कर्मचारी यांचा मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात ( Prakash Abitkar ) आला.