Team MyPuneCity – आज दिनांक 17 मे, शनिवार रोजी पिंपरी चिंचवड म. न. पा व पूर्णानगर विकास कृती समिती ह्यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रीडासंकुल येथे स्वच्छता व पर्यावरण संवर्धन मोहीम राबविण्यात आली. त्या प्रसंगी राजेंद्र घावटे, पि. चि. शहर, कार्याध्यक्ष व्याख्यान्माला समिती अंकुश सुद्रिक, जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष, श्रीकांत करोली, उधोगपती संजय नाना पठारे, उद्योजक पप्पू शेठ लोढा, सामाजिक कार्यकर्ते टाकळकर,जेष्ठ नागरिक, पालिकेचे सुभाष कांबळे, आरोग्य सहाय्यक निरीक्षक, सुरेखा हिंगडे, सहाय्यक अधिकारी, कैलास जगताप, पर्यवेक्षक अधिकारी, आदित्य पवार, पर्यवेक्षक अधिकारी, महेश सांगडे, पर्यवेक्षक अधिकारी अन्य सहकारी व नागरिकांचा देखील उस्फुर्त सहभाग होता.
“स्वच्छता ही बाब आपल्या सर्वांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक असून ती करणे आवश्यक व गरजेचे आहे. त्यासाठी सर्व स्तरांवरील नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे.” असे पूर्णांनगर विकास कृती समितीचे अध्यक्ष सुनील कदम म्हणाले.
PCMC : पिंपरी- चिंचवड शहरातील इंद्रायणी नदी पात्रातील अनधिकृत बंगल्यांविरोधात महापालिकेची मोठी कारवाई

येत्या दोन दिवसात उद्यानांमधील वाढलेले गवत छटाई चे कार्य पालिकेतर्फे चालू करण्यात येणार आहे असे अधिकारी वर्गातून सांगण्यात आले.

आपले परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे असे समजून सर्वांनी सहभाग घेतला.


















