Team My Pune City – पुणे शहराचा वाढता विस्तार आणि वाढती ( Police Station )लोकसंख्या लक्षात घेऊन गृह विभागाने पुणे पोलिस दलाला मोठा बळकटीकरणाचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने शहरात पाच नवीन पोलीस ठाण्यांना तसेच दोन नवीन परिमंडळांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पुणे पोलिसांची कार्यक्षमता वाढून कायदा-सुव्यवस्थेची अंमलबजावणी अधिक सक्षम होणार आहे.
Elections : ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश
लक्ष्मीनगर (येरवडा), लोहगाव, नन्हे, येवलेवाडी (कोंढवा) आणि मांजरी अशा( Police Station ) पाच नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 800 पोलीस कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले असून, परिमंडळ सहा आणि सात अशी दोन नवीन परिमंडळेही कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
नवीन ठाण्यांची निर्मिती विद्यमान ठाण्यांच्या विभाजनातून होणार( Police Station ) आहे. विमानतळ पोलीस ठाण्यातून लोहगाव ठाणे, हडपसरमधून मांजरी ठाणे, सिंहगड रस्ता ठाण्यातून नन्हे ठाणे, येरवड्यातून लक्ष्मीनगर ठाणे आणि कोंढवा ठाण्यातून येवलेवाडी ठाण्याची निर्मिती करण्यात येणार आहे.
गेल्या महिन्यात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एआय तंत्रज्ञानावर ( Police Station )आधारित सीसीटीव्ही प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळीच पुणे शहरातील वाढत्या क्षेत्रफळाचा विचार करून नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव सरकारकडे पाठविल्याची माहिती त्यांनी दिली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संदर्भातील प्रस्ताव सादर केला होता.
शहरात एक वर्षापूर्वी सात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात ( Police Station )आली होती. आता आणखी पाच नवीन ठाण्यांमुळे एकूण ठाण्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढणार आहे. तसेच सात नवीन उपायुक्त पदांची निर्मिती करण्याचाही प्रस्ताव सादर करण्यात आला होता, त्यालाही मंजुरी मिळाली आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार व सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच नवीन पोलीस ठाण्यांसाठी जागा निश्चित करून प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ऑक्टोबर महिनाअखेरीस ही पोलीस ठाणे ( Police Station ) कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.