Team My Pune City – कोंढवा व येवलेवाडी परिसरातील प्रवासी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) ( PMPML) पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द असा सध्या सुरू असलेला बसमार्ग क्र. १७० येवलेवाडीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा विस्तार रविवार, दि. २८ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार असून येथील प्रवाशांच्या दीर्घकाळच्या मागणीला यामुळे प्रतिसाद मिळाला आहे.
Pune: सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करत चित्रपट निर्मिती करा – गश्मीर महाजनी
पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या मार्गदर्शनानुसार ( PMPML) हा निर्णय घेण्यात आला आहे. येवलेवाडी परिसरातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक यांना आता अधिक सोयीस्कर आणि थेट बससेवा मिळणार आहे.
Rashi Bhavishya 29 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
बसमार्गाचा तपशील
बसमार्ग क्रमांक : १७० (पुणे स्टेशन – येवलेवाडी)( PMPML) बसमार्ग क्रमांक : १७० (पुणे स्टेशन – येवलेवाडी)
मार्गे थांबे : पुणे स्टेशन, वेस्टएंड, महात्मा गांधी बस स्थानक, मिलिटरी हॉस्पिटल वानवडी, नेताजीनगर, लुल्लानगर, कोंढवा खुर्द, कोंढवा पोलीस स्टेशन, खडी मशीन, सिंहगड कॉलेज कोंढवा रोड, कोंढवा हॉस्पिटल, येवलेवाडी.
एकूण बससंख्या : ११( PMPML)
वारंवारिता : दर १५ मिनिटांनी बस उपलब्ध
वेळापत्रक ( PMPML)
पुणे स्टेशनहून पहिली बस – पहाटे ०४:५० वा.
पुणे स्टेशनहून शेवटची बस – रात्री १०:४५ वा.
येवलेवाडीहून पहिली बस – सकाळी ०५:४५ वा.
येवलेवाडीहून शेवटची बस – रात्री ११:४५ वा.
या नव्या बससेवेचा लाभ जास्तीत जास्त प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएलतर्फे करण्यात आले आहे. यामुळे येवलेवाडी परिसरातून पुणे शहराच्या विविध भागांशी दळणवळण ( PMPML) अधिक सुलभ होणार आहे.