भाविकांसाठी वातानुकूलित स्मार्ट ई-बसद्वारे तीर्थयात्रेचा अनुभव; प्रत्येक शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी सेवा उपलब्ध
Team My Pune City – श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर (PMPML)भाविक व पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) तर्फे शिवलिंग तीर्थक्षेत्र दर्शनासाठी विशेष ‘पर्यटन बससेवा क्र.12 ’ दि. 2 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येत आहे. पूर्णपणे वातानुकूलित स्मार्ट इलेक्ट्रिक बसमधून भाविकांना सहलीचा अनुभव घेता येणार असून ही सेवा प्रत्येक शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये व गरजेनुसार इतर दिवशीही उपलब्ध असेल.
सेवेचा मार्ग व वेळा पुढीलप्रमाणे आहेत:
पुणे स्टेशन → स्वारगेट → श्री. क्षेत्र भुलेश्वर मंदिर, माळसिरस → श्री. त्रिंबकेश्वर मंदिर, हिवरे → श्री. संगमेश्वर मंदिर, सासवड → श्री. चांगावटेश्वर मंदिर, सासवड → श्री. नारायणेश्वर मंदिर, नारायणपूर → श्री. बनेश्वर मंदिर → स्वारगेट → पुणे स्टेशन
Ajit Foundation: अजित फाऊंडेशनला CSR अंतर्गत किराणा साहित्याची भरीव
Firing : जमिनीच्या वादातून भावावर गोळीबार
बस सुरू होण्याची वेळ – सकाळी ८.३० वा. (पुणे स्टेशनहून)
परतीची वेळ – संध्याकाळी 7 वा.
प्रति प्रवासी तिकीट दर – 500
पहिला व शेवटचा थांबा – पुणे स्टेशन
अन्य पर्यटन बससेवा आणि सवलती:
🔹 पीएमपीएमएलच्या एकूण १२ पर्यटन बससेवा प्रवाशांच्या सेवेत असून, बस क्रमांक १ ते १० साठी ३३ प्रवाशांचे ग्रुप बुकिंग केल्यास ५ प्रवाशांना तिकीट सवलत दिली जाते.
🔹 लोणावळा मार्गावरील (बस क्र. 11) सेवा मात्र या सवलतीस अपवाद आहे.
🔹 सर्व मार्गावरील तिकीट दर 500/- प्रतिव्यक्ती निश्चित करण्यात आले आहेत.
तिकीट बुकिंगसाठी केंद्रे:
डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, पुणे मनपा भवन, भोसरी बसस्थानक, निगडी.
पुणेकर पर्यटक, निसर्गप्रेमी व भक्तजनांनी पीएमपीएमएलच्या या परवडणाऱ्या, पर्यावरणपूरक व आरामदायी बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.