Team My Pune City : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर( PMPML) पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) भाविक-भक्त व पर्यटकांसाठी विशेष पर्यटन बससेवा सुरू केली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातील देवींच्या शक्ती स्थळांना भाविकांना भेट देता यावी, यासाठी परिवहन महामंडळाच्या एकूण १३ वातानुकूलीत स्मार्ट इलेक्ट्रिक पर्यटन बससेवा प्रवाशांच्या सेवेत धावणार आहे.
Pune:’वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना अंधश्रद्धा नसून हिंदुत्वाचा सर्वोच्च बिंदू – संजय उपाध्ये
शनिवार-रविवार, सार्वजनिक सुट्टी तसेच प्रवाशांच्या मागणीनुसार इतर दिवशीही या बससेवा उपलब्ध राहणार आहेत. किफायतशीर दर, आरामदायी ( PMPML)प्रवास व संपूर्ण वातानुकूलीत स्मार्ट बसमधील सफरीमुळे या बससेवेला पर्यटक व भाविकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पीएमपीएमएल प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Shrikrishna Panse : जुन्या पिढीतील कवी व भगवद्गीतेचे अभ्यासक श्रीकृष्ण पानसे यांचे निधन
परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. पंकज देवरे यांच्या संकल्पनेतून दि. २३ सप्टेंबर २०२५ पासून या विशेष सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. ( PMPML)महामंडळाचे उत्पन्न वाढीसोबतच भाविक-भक्तांच्या धार्मिक पर्यटनाची सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
—
पर्यटन बससेवा क्र. १३ (१)
मार्ग : पुणे स्टेशन → स्वारगेट → तळजाई माता मंदिर → पद्मावती मंदिर → तुकाई माता मंदिर (कोंढणपूर) → श्रीनाथ म्हस्कोबा-जोगेश्वरी माता मंदिर (कोडीत, ता. पुरंदर) → यमाई माता मंदिर (शिवरी, ता. पुरंदर) → स्वारगेट → पुणे स्टेशन.( PMPML)
सुटण्याची वेळ : सकाळी ८.३० (पुणे स्टेशन)
पोहोचण्याची वेळ : संध्याकाळी ७.००
तिकीट दर : प्रति प्रवासी ५०० रुपये
पर्यटन बससेवा क्र. १३ (२)
मार्ग : पुणे स्टेशन → स्वारगेट → महालक्ष्मी मंदिर (सारसबाग) → तांबडी जोगेश्वरी मंदिर (बुधवार पेठ) → चतुश्रृंगी माता मंदिर (सेनापती बापट रोड) → वैष्णवी माता मंदिर (पिंपरी कॅम्प) → भवानी माता मंदिर (भवानी पेठ) → स्वारगेट → पुणे स्टेशन.
सुटण्याची वेळ : सकाळी ८.३० (पुणे स्टेशन)
पोहोचण्याची वेळ : संध्याकाळी ७.००
तिकीट दर : प्रति प्रवासी ५०० रुपये
—
या उपक्रमामुळे पुणेकरांसह जिल्ह्यातील भाविकांना नवरात्रोत्सवाच्या काळात देवींच्या दर्शनाची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने भाविकांनी या बससेवांचा ( PMPML) लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.