Team My Pune City – रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर (PMPML)पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तसेच उपनगर व ग्रामीण भागातील प्रवाशांचा वाढता प्रवास लक्षात घेऊन पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ) कडून शनिवार, दिनांक 9 ऑगस्ट रोजी जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या दिवशी नेहमीच्या तुलनेत 73 अतिरिक्त बसेस मार्गावर धावणार असून एकूण 1 हजार 995 बसेसची वाहतूक सेवा उपलब्ध राहणार आहे.
दरवर्षी रक्षाबंधन दिवशी भावंडे एकमेकांच्या घरी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलने विशेष नियोजन करत नियोजित 1 हजार 922 बसेस व्यतिरिक्त 73 अतिरिक्त बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा सणासुदीचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
Lonavala Crime News : जमीन खरेदी फसवणुक प्रकरणी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल, अजिवली येथील प्रकार
या विशेष वाहतूक व्यवस्थेसाठी वाहक, चालक आणि पर्यवेक्षक कर्मचारी यांचे साप्ताहिक सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. शिवाय, प्रमुख बसस्थानकांवर बस संचालनावर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
रक्षाबंधन शनिवार, 9 ऑगस्ट रोजी येत असल्याने पीएमपीएमएलकडून 8,9,10 व 11 ऑगस्ट या चार दिवसांसाठीही जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
महामंडळाच्या वतीने प्रवासी नागरिकांनी या सुविधा लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे व या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.