Team My Pune City – पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) प्रवाशांच्या सुविधेसाठी एक अभिनव उपक्रम सुरु केला असून, “फिरते पास केंद्र” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेची औपचारिक सुरुवात आज करण्यात आली. महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या संकल्पनेतून ही योजना आकारास आली आहे. उद्घाटन समारंभ मुख्य प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात पार पडला. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
PCMC: पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ अभियानाची झाली सुरुवात
योजनेचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू:
“फिरते पास केंद्र” उपक्रमाअंतर्गत आता नागरिकांना व विद्यार्थ्यांना आपापल्या परिसरातच मासिक बस पास काढण्याची सुविधा उपलब्ध होणार ( PMPML) आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीतील ग्रामीण भागातील सहा ठिकाणी सोमवार ते शनिवार सकाळी 7.30 ते दुपारी 1.30 या वेळेत ही केंद्रे कार्यरत राहणार आहेत.
या केंद्रांवर विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी मासिक पासची सोय करण्यात आली असून, महानगरपालिकेच्या अनुदानित योजनांची माहितीही नागरिकांना मिळणार आहे. रोख, क्यूआर कोड व पीओएस मशीनद्वारे देयक ( PMPML) स्वीकारले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कोणतीही अडचण न येता सोयीस्कर पद्धतीने सेवा घेता येणार आहे.
Rashi Bhavishya 6 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
साप्ताहिक वेळापत्रक आणि ठिकाणे खालीलप्रमाणे: ( PMPML)
सोमवार – एस. एन. डी. टी. कॉलेज (मेट्रो स्टेशन)
मंगळवार – कोंढवा गेट (एन. डी. ए. गेट सर्कल)
बुधवार – खडी मशिन चौक (के. जे. व जे. के. कॉलेज)
गुरुवार – राधा चौक (बाणेर – बालेवाडी)
शुक्रवार – हिंजवडी गाव (शिवाजी चौक)
शनिवार – आकुर्डी रेल्वे स्टेशन
या उपक्रमाद्वारे पीएमपीएमएलच्या विविध योजनांचे प्रबोधनही होणार असून, ‘पुणे दर्शन’, ‘पुणे पर्यटन सेवा’, ‘आपली पीएमपीएमएल’ मोबाईल अॅप, ‘महिला विशेष सेवा’, ‘रातराणी बस’ इत्यादींची माहितीही प्रवाशांपर्यंत पोहोचवली जाणार ( PMPML) आहे.