Team My Pune City –Team My Pune City – गणेश विसर्जन मिरवणुकीच्या ( PMPML) दिवशी शनिवारी (दि. 6) पुण्यातील वाहतूक व्यवस्थापनासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) विशेष नियोजन आखले आहे. या दिवशी विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट चौक व डेक्कन चौक परिसर बस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोय होऊ नये यासाठी काही महत्त्वाचे बस थांबे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहेत.
GST : जीएसटी सुधारांमुळे महागाईत दिलासा, गृहनिर्माण व निर्यात क्षेत्राला नवा वेग – राजेश अग्रवाल
विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड, टिळक रोड आणि कर्वे रोड हे मुख्य मार्ग बस वाहतुकीसाठी बंद राहतील. परिणामी या मार्गांवरून ( PMPML) सुटणाऱ्या बसेस त्यांच्या मूळ स्थानकांहून न सुटता नव्याने निश्चित करण्यात आलेल्या तात्पुरत्या ठिकाणांहून प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. पीएमपीएमएलने दिलेल्या माहितीनुसार, खालील प्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे :
शाहू महाराज स्थानक (स्वारगेट) येथून सातारा रोडने ( PMPML)कात्रज व मार्केटयार्डकडे जाणाऱ्या बसेस आता लक्ष्मी नारायण चौकातून सुटतील.
नटराज बस स्थानकातून सिंहगड रोडकडे जाणाऱ्या बसेस पर्वती पायथा (स्वामी समर्थ मठ) बस थांब्यावरून सुटतील.
स्वारगेट स्थानका बाहेरून सोलापूर रोडने पुलगेट ( PMPML) व हडपसरकडे जाणाऱ्या तसेच भवानी पेठ, नानापेठ, रास्ता पेठकडे जाणाऱ्या बसेस वेगा सेंटर (स्वारगेट डेपो जवळ) येथून सोडल्या जातील.
डेक्कन जिमखाना स्थानकातून कोथरूड डेपो, माळवाडी व एनडीए गेटकडे जाणाऱ्या बसेस आता एस.एन.डी.टी. कॉलेजजवळून सुटतील.
पीएमपीएमएल प्रशासनाने प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी व विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले ( PMPML) आहे.