Team My Pune City – सिंहगड रोड परिसरातील (PMPML)नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) पुणे स्टेशन ते सनसिटी असा नवा बसमार्ग सुरू केला आहे. नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीला प्रतिसाद देत आणि पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. पंकज देवरे यांच्या निर्देशानुसार ही सेवा मंगळवार (दि.9) पासून प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
या मार्गाला 57-ब असे क्रमांक देण्यात आले असून तो पुणे स्टेशन ते सनसिटीदरम्यान धावणार आहे. हा मार्ग अपोलो टॉकीज, सिटी पोस्ट, गांजवेवाडी, विठ्ठलवाडी जकात नाका, हिंगणे, आनंदनगर मार्गे सनसिटीपर्यंत जाणार आहे.
Bhosari: प्रवीण गायकवाड यांना ” द थेम्स इंटरनॅशनल विद्यापीठाकडून” पीएचडी पदवी प्रदान
Lonavala: बस प्रवासादरम्यान महिलेचे सहा लाखाचे दागिने चोरीला
फेऱ्यांचा तपशील
पुणे स्टेशनहून पहिली बस सकाळी 6 वाजता सुटेल, तर शेवटची बस रात्री 8.55 वाजता असेल.
सनसिटीहून पहिली बस सकाळी 7 वाजता सुटेल, तर शेवटची बस रात्री 10.05 वाजता सुटणार आहे.
या मार्गावर दिवसभरात दोन्हीकडून एकूण 12 फेऱ्या (पुणे स्टेशनहून 6 व सनसिटीहून 6) चालवल्या जाणार आहेत.
सनसिटी व आनंदनगर परिसरातील रहिवाशांकडून गेल्या काही महिन्यांपासून या बसमार्गाची मागणी होत होती. दररोज हजारो विद्यार्थी, कामगार, नोकरदार व महिला वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक प्रवासासाठी या मार्गावर अवलंबून असतात. त्यामुळे आता नागरिकांना पुणे स्टेशनकडे थेट प्रवास सोयीचा होणार आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाने प्रवाशांना या नव्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून “हा मार्ग सुरू झाल्यामुळे वेळ वाचेल आणि प्रवासाचा त्रासही कमी होईल,” अशा भावना व्यक्त केल्या आहेत.