Team My Pune City – रक्षाबंधन सणानिमित्त (PMPML)पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) कडून 8 ते 11, ऑगस्ट या चार दिवसांसाठी करण्यात आलेल्या जादा बससेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कालावधीत यामधून पीएमपीएमएलला तब्बल 10 कोटी 35 लाख 40 हजार 448 रुपये इतके उत्पन्न झाले.
ही बससेवा पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच पी.एम.आर.डी.ए. हद्दीतील नागरिकांच्या सोयीसाठी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर प्रवासी सहभागी झाले.या कालावधीत एकूण 7 हजार 698 बस चालविण्यात आल्या असून, त्याद्वारे तब्बल 48 लाख 93 हजार 878 प्रवाशांनी प्रवास केला.
Mahesh Landge:भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आता ‘‘दिल्ली पॅटर्न’’
Talegaon Dabhade: श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त पुरातन श्री गणपती मंदिरात सहस्त्रावर्तन महाभिषेक
दिवसनिहाय प्रवासी व उत्पन्न
8 ऑगस्ट – 1 हजार 911 बसेस, 12 लाख 34 हजार 48 प्रवाशी, उत्पन्न – 2 कोटी 45 लाख 89 हजार 935
9 ऑगस्ट – 1 हजार 975 बसेस, 12 लाख 31 हजार 531 प्रवाशी, उत्पन्न – 2 कोटी 61 लाख 19 हजार 27 रुपये
10 ऑगस्ट – 1 हजार 936 बसेस, 11 लाख 77 हजार 608 प्रवाशी, उत्पन्न – 2 कोटी 45 लाख 89 हजार 426
11 ऑगस्ट – 1 हजार 876 बसेस, 12 लाख 49 हजार 611 प्रवाशी, उत्पन्न 2 कोटी 81 लाख 42 हजार 60
प्राप्त उत्पन्नामध्ये तिकीट विक्री, पास विक्री, ई-तिकीट मशिनमधील क्यूआर कोडद्वारे तसेच मोबाईल अॅपद्वारे झालेली तिकीट व पास विक्रीचा समावेश आहे.
पीएमपीएमएल प्रशासनाने नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, जेणेकरून सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडी टाळता येईल आणि पर्यावरणपूरक प्रवासाला चालना मिळेल, असे आवाहन केले आहे.