Team My Pune City – पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) ( PMPML) ऑगस्ट महिन्यातील वीजबिल वेळेत न भरल्यामुळे मिळणारी सवलत गमावली आहे. त्यामुळे महामंडळाला तब्बल चार लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. वीजबिल भरण्याची जबाबदारी असलेल्या विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा तोटा झाल्याची माहिती समोर आली आहे.
Nilesh Ghaywal : पुण्यातील युवकावर गोळीबार करणारा निलेश घायवळ स्वित्झर्लंडला फरार
पीएमपीचे स्वारगेट येथील मुख्यालय, १६ डेपो आणि सहा इलेक्ट्रिक बस डेपो येथे महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. या सर्व ठिकाणांचे दरमहा साधारण साडेचार कोटी रुपयांचे वीजबिल येते. हे बिल विशिष्ट कालावधीत भरल्यास साधारण साडेतीन ते चार लाख रुपयांची सवलत मिळते. मात्र, ऑगस्ट महिन्यातील बिल भरण्याची अंतिम मुदत पाळण्यात प्रशासन ( PMPML) अपयशी ठरले.
वीजबिल वेळेत भरण्यासाठी संबंधित विद्युत विभाग जबाबदार असतानाही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पीएमपीला या सवलतीपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे अनावश्यकरीत्या चार लाख रुपयांचा भुर्दंड बसला आहे. या प्रकरणी आतंरिक चौकशीची मागणी होत असून निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही चर्चा सुरू ( PMPML) आहे.