Team My Pune City – केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री ई-ड्राइव्ह’ योजनेअंतर्गत ( PMPML) पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात लवकरच एक हजार इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार या बस खरेदीचा प्रस्ताव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.
Pune Metro : स्वारगेट–कात्रज भूमिगत मेट्रो मार्गिकेचे काम अदानी समूहाला; डिसेंबर अखेर सुरुवात
केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यासोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही( PMPML) करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
मोहोळ म्हणाले, “पुणे शहरातील लोकसंख्यावाढ आणि झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. वाहतूक कोंडी आणि वाढते प्रदूषण या समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. सध्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात सुमारे दोन हजार बस आहेत; मात्र भविष्यातील गरजेनुसार किमान चार हजार बस आवश्यक आहेत. मेट्रोला पूरक सेवा देण्यासाठी ई-बसची ही खरेदी महत्त्वाची ठरणार ( PMPML) आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेकडे ई-बस खरेदीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. बँकेने या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य आणि हमी दिल्यामुळे केंद्र सरकारकडे अधिकृत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मेट्रो मार्गांचा विस्तार आणि पीएमपीएमएलचे सक्षमीकरण हे राज्य सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या उपक्रमांमुळे पुणेकरांना अधिक सोयीस्कर, पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम वाहतूक सुविधा उपलब्ध ( PMPML) होतील.