Team My Pune City – दहीहंडी उत्सवामुळे शहरातील ( PMPML) पीएमपी बससेवेच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. शनिवार (16) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस आणि पीएमपी प्रशासनाने काही मार्ग तात्पुरते बदलले आहेत.
शनिवारवाडा ते सिंहगड या मार्गावरील बस दहीहंडीच्या ( PMPML) दिवशी रस्ता बंद झाल्यानंतर थेट स्वारगेट येथून सुरू राहतील. तर, अप्पा बळवंत चौक ते सांगवी या मार्गावरील बस मनपा (महापालिका) येथून धावणार आहेत.
शिवाजी रोड मार्गे धावणाऱ्या बसमध्येही बदल करण्यात आला असून, या बस आता शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाताना जंगली महाराज रोड आणि टिळक रोड मार्गे धावतील. तसेच स्वारगेटहून सुटणाऱ्या बस बाजीराव रस्ता आणि टिळक रस्ता मार्गे चालविण्यात येतील.
दरम्यान, पुणे स्टेशनकडून स्वारगेटकडे अथवा कोथरूडकडे जाणाऱ्या बस या जुना बाजार, मनपा आणि डेक्कन जिमखाना मार्गे धावणार ( PMPML) आहेत.
Vadgaon Maval : सामाजिक कार्यकर्ते अशोक घोजगे यांचे निधन
दहीहंडी उत्सवामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी संयम बाळगावा आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.
प्रवाशांना गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरते मार्ग बदल करण्यात आले असून, पोलिसांच्या सूचनेनुसार वाहतुकीचे नियोजन करण्यात येत ( PMPML) आहे.