Team My Pune City – गणेशोत्सव काळात 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पुणे शहरात ( PMPML ) मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित असून, देखावे पाहण्यासाठी मध्यवर्ती भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून काही प्रमुख रस्ते सायंकाळी साधारण पाच वाजल्यापासून बंद ठेवले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) ने अनेक बसमार्गांना पर्यायी रस्त्यांवर वळविण्याचे नियोजन जाहीर केले आहे.
TVS Service Center : पुण्यात टिव्हीएसच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आगीत 60 दुचाकी जळून खाक
पीएमपीएमएलने दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी रोड, टिळक रोड, लक्ष्मी रोड ( PMPML ) आदी वाहतुकीस बंद झाल्यास संबंधित बस मार्ग पर्यायी मार्गांनी संचलित होतील. उदाहरणार्थ, मार्ग क्र. २, ११, १३, २१, ३० आदी बसेस शिवाजी रोडऐवजी जगंली महाराज रोड, बालगंधर्व, डेक्कन, संभाजी पूल, टिळक रोडमार्गे स्वारगेटकडे जातील. तर टिळक रोड बंद झाल्यास ह्याच बसेस शास्त्री रोडने दांडेकर पूल, मित्र मंडळ चौक, लक्ष्मीनारायण चौक मार्गे धावतील.
Rashi Bhavishya 26 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
मार्ग क्र. ५५ च्या बसेस शनिपार/मंडईऐवजी नटराज स्थानकावरून सोडल्या जातील.
मार्ग क्र. ५८ व ५९ च्या बसेस डेक्कन जिमखाना स्थानकावरून सुरू होतील.
कोथरूडहून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या ८, ८१, ९४, १०८, १४३ आदी बसमार्गांमध्ये बदल होणार नसला तरी स्टेशनवरून परतीच्या प्रवासात त्या ससून हॉस्पिटल, मालधक्का, जुना बाजार, म.न.पा. भवन, बालगंधर्व मार्गे जातील.
कोंढवा गेटहून येणाऱ्या मार्ग क्र. १७४ च्या बसेस केळकर रोड, लालमहाल, देवजी बाबा मंदिर, हमजे खान चौक मार्गे स्टेशनकडे ( PMPML ) धावतील.
तर ७ व २०२ क्रमांकाच्या बसेस म्हात्रेपूल, शंकरशेठ रोड, रामोशी गेट, भवानीमाता मंदिर या मार्गाने स्वारगेटकडे जातील.
याशिवाय, १२, ४२, २९९ क्रमांकाच्या बसेस शास्त्री रोड बंद झाल्यास दांडेकर पूलमार्गे कर्वे रोडने धावतील.
११३, ११३अ च्या बसेस दोन्ही पाळीमध्ये मनपा पंप स्थानकावरून सुटतील, तर १७ व ५० क्रमांकाच्या बसेस शिवाजी रोड बंद झाल्यास स्वारगेट/नटराज स्थानकावरून ( PMPML ) सोडल्या जातील.
पुण्यातील मध्यवर्ती भागात रोज संध्याकाळी पाचनंतर रस्ते बंद झाल्यावर हे बदल लागू होतील. मात्र, ऐनवेळी वाहतूक पोलीस विभागाकडून रस्ते बंद किंवा उघडे करण्यात अतिरिक्त बदल केले गेल्यास त्यानुसार बस सेवा चालविण्यात येईल, असे पीएमपीएमएलने स्पष्ट केले आहे.
या बदलांमुळे प्रवासी व गणेशभक्तांनी प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी मार्गांची नोंद ठेवण्याचे आवाहन पीएमपीएमएलने केले ( PMPML ) आहे.