Team MyPuneCity –‘पीएमपीएमएल’ कडून बसमार्ग क्र. ७९ – हिंजवडी (माण) फेज क्र.३ ते डेक्कन जिमखाना, बसमार्ग क्र. ३१८ – पुणे स्टेशन ते कृष्णानगर व बसमार्ग क्र. वाय-३८ भोसरी ते तुळापुर हे तीन बसमार्ग नव्याने सुरु होत असून बसमार्ग क्र. २९७ – राजस सोसायटी ते स्वारगेट या मार्गाचा विस्तार शिवाजीनगर रेल्वे स्टेशन पर्यंत करण्यात येणार आहे. बसमार्ग क्र. वाय-३८ भोसरी ते तुळापुर हा फक्त रविवार व सार्वजनिक सुट्टी दिवशी संचलनात राहील, अशी माहिती ‘पीएमपीएमएल’ देण्यात आली आहे.पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या मागणी नुसार व त्यांच्या सोईसाठी हे तीन बसमार्ग नव्याने सुरु करण्यात आलेले आहेत.
नवीन सुरु केलेल्या बसमार्गांचा तपशील खालीलप्रमाणे
- बसमार्ग क्र. ७९ – हिंजवडी (माण) फेज क्र.३ ते डेक्कन जिमखाना.
- मार्गे :- हिंजवडी, इन्फोसिस फेज – २, शिवाजी चौक, वाकड ब्रिज, सुतारवाडी, बावधन, चांदणी चौक,
कोथरूड डेपो, वनाज कंपनी, एस.एन.डी.टी. कॉलेज, डेक्कन जिमखाना.
बस संख्या :- २.
वारंवारिता :- १ तास ४० मिनिटे.
- * बसमार्ग क्र. ३१८ – पुणे स्टेशन ते कृष्णानगर.
मार्ग :- पुणे स्टेशन, आर.टी.ओ. पुणे, सिमला ऑफिस, औंध गाव, काळेवाडी फाटा, केएसबी चौक, घरकुल
वसाहत चिखली, साने चौक, कृष्णानगर.
बस संख्या :- २.
वारंवारिता – १ तास २० मिनिटे. - बसमार्ग क्र. वाय-३८ भोसरी ते तुळापुर. (फक्त रविवार व सार्वजनिक सुट्टी दिवशी संचलनात राहील)
मार्गे :- भोसरी, शास्त्री चौक, थोरल्या पादुका मंदिर, देहू फाटा, आळंदी, सोळूगांव, वडगाव शिंदे फाटा,
मरकळ गाव, तुळापुर गाव.
बस संख्या :- २.
वारंवारिता :- १ तास १५ मिनिटे.
Talegaon News : तळेगावमध्ये ओढे-नाले सफाईचे काम युद्ध पातळीवर!
- विस्तार केलेल्या बसमार्गांचा तपशील खालीलप्रमाणे
बसमार्ग क्र. २९७ – राजस सोसायटी ते स्वारगेट या मार्गाचा विस्तार शिवाजीनगर रेल्वे स्टेशन पर्यंत.
मार्गे :- राजस सोसायटी, कात्रज, बालाजी नगर, स्वारगेट, अ.ब.चौक, शनिवार वाडा, सिमला ऑफिस,
शिवाजीनगर.
बस संख्या :- १.
वारंवारिता :- २ तास.
तरी या बससेवेचा लाभ प्रवाशी नागरीक, विद्यार्थी, नोकरदार, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरीक यांनी घ्यावा असे आवाहन
परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.