Team My Pune City – राज्य शासनाच्या( PMC) ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या विशेष मोहिमेत पुणे महानगरपालिकेने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांचा सत्कार करून गौरव केला.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रिथ्वीराज बी. पी. यांच्यासह विविध महापालिकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अनेक विभागांच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर पुणे महापालिका ही सर्वोत्कृष्ट स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून निवडण्यात आली.
आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रसंगी महापालिकेच्या प्रगतीविषयी सात महत्त्वाचे मुद्दे सादर केले. त्यात तंत्रज्ञानाचा वापर करून प्रलंबित प्रश्न १५० दिवसांत सोडविणे, नागरिकाभिमुख सेवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणे यांचा विशेष उल्लेख होता.
पुणे महापालिकेची ठळक कामगिरी:( PMC)
डिजिटल सेवा: सार्वजनिक सेवा हक्क कायद्यांतर्गत असलेल्या ९७ सेवांपैकी तब्बल ८९ सेवा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आल्या असून, गेल्या वर्षभरात २.२५ लाख नागरिकांना याचा लाभ झाला.
तक्रार निवारण: नागरिकांना मोबाईल अॅप्स, व्हॉट्सअॅप, सोशल मीडिया ( PMC) आदी १० माध्यमांद्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मागील वर्षभरात १.१५ लाख तक्रारींचे निवारण करण्यात आले.
वेबसाइट व अॅप्स: महापालिकेची द्विभाषिक मोबाईल-फ्रेंडली वेबसाइट आणि ‘पीएमसी केअर’, ‘रोड मित्रा’, ‘पीएमसी आयएसडब्ल्यूएम’ ही अॅप्स मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहेत. ६७ लाख नागरिकांनी एका वर्षात वेबसाइटचा वापर केला.
ई-ऑफिस: २,५०० हून अधिक कर्मचारी ई-ऑफिस प्रणालीचा वापर करीत असून यामुळे प्रशासनिक कार्यक्षमता वाढली आहे.
जीआयएस तंत्रज्ञान: रस्ता मालमत्ता व्यवस्थापन आणि एकात्मिक कामकाज व्यवस्थापनात जीआयएसचा यशस्वी वापर.
डेटा व अॅनालिटिक्स: ५०० पेक्षा जास्त कामगिरी ( PMC) निर्देशकांचा डॅशबोर्ड आणि ‘पीएमसी स्पार्क’ या वॉर रूममधून दर पंधरवड्याला ५० प्रकल्पांचे परीक्षण.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI): ऑनलाइन सेवा, व्हॉट्सअॅप चॅटबॉट तसेच तक्रारींचे विश्लेषण व मालमत्ता कर वसुलीसाठी AI चा वापर करण्याचे नियोजन.
आयुक्त राम म्हणाले, “तंत्रज्ञानाधारित प्रशासन व नागरिकांना जलद सेवा देण्यावर महापालिकेचा भर असल्यामुळेच हे यश शक्य झाले.”
या यशामुळे पुणे महापालिकेने राज्यातील इतर सर्व महापालिकांसाठी ई-गव्हर्नन्स क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला ( PMC) आहे.