situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PMC : पुणे महापालिकेची ‘अभय योजना’; थकबाकीदारांना ७५ टक्के दंडमाफीची संधी

Published On:
PMC

Team My Pune City – नागरिकांकडून मोठ्या ( PMC) प्रमाणात थकलेला मिळकतकर वसूल करण्यासाठी पुणे महापालिकेने पुन्हा एकदा ‘अभय योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या दोन महिन्यांच्या कालावधीत लागू राहणार असून, या दरम्यान मिळकतकराच्या थकबाकीवरील दंडात ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, योजनेचा उद्देश नागरिकांना थकबाकी भरायला प्रोत्साहन देणे आणि महापालिकेच्या तिजोरीत निधी जमा करून विकासकामांना गती देणे हा ( PMC)आहे.

Today’s Horoscope, Saturday : आजचे राशीभविष्य – शनिवार, ८ नोव्हेंबर २०२५

१२ हजार कोटींची थकबाकी; ९ हजार कोटी फक्त दंड ( PMC)

सध्या पुणे महापालिकेच्या मिळकतदारांकडे तब्बल १२ हजार १६१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये ३ हजार १५८ कोटी रुपये मूळ मिळकतकर, तर उर्वरित ९ हजार कोटी रुपये दंडाच्या स्वरूपात आहेत. थकबाकीवर प्रत्येक महिन्याला दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने रक्कम सातत्याने वाढत चालली आहे.

Parth Pawar Land Case : जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांची अडचण वाढली; व्यवहार रद्द करण्यासाठी 21 कोटींच्या मुद्रांक शुल्काची अट

ज्यांनी आधी सवलत घेतली, त्यांना यावेळी लाभ नाही

महापालिकेने यापूर्वीही ‘अभय योजना’ राबवली होती, ज्यातून १ लाख ४० हजारांहून अधिक मिळकतदारांना सवलत मिळाली होती. मात्र, यावेळी ज्यांनी मागील योजनेचा लाभ घेतला आणि नंतर पुन्हा थकबाकीदार झाले, त्यांना या नवीन योजनेचा फायदा दिला जाणार नाही.

सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी या मागणीची नोंद आयुक्तांकडे केली होती, आणि प्रशासनाने त्यावर सकारात्मक भूमिका घेतली आहे.

सर्व मिळकतदारांसाठी समान संधी

‘अभय योजने’चा लाभ घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक सर्व प्रकारच्या मिळकतींना मिळणार आहे. मात्र, सवलत केवळ दंडाच्या रकमेत असेल; मूळ मिळकतकरात कोणतीही सवलत मिळणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

विकासकामांसाठी निधी उपलब्ध होणार

महापालिकेने या योजनेद्वारे ५ हजार ४०८ कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा निधी ‘मिसिंग लिंक’ रस्ते प्रकल्पांसह इतर महत्त्वाच्या विकासकामांसाठी वापरण्यात येईल, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

“महापालिकेची प्रलंबित थकबाकी वसूल करून नागरिकांसाठी चालू असलेली विकासकामे पूर्णत्वास नेणे, हा ‘अभय योजने’चा मुख्य हेतू आहे.”
— नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महानगरपालिका ( PMC)

Follow Us On

Also Read