Team My Pune City – पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ( PMC ) अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर प्रभागनिहाय आरक्षण सोडतीची उत्सुकता वाढली आहे. सुरुवातीला १० ऑक्टोबर रोजी म्हणजे आज सोडत होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप आदेश न आल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
Rashi Bhavishya 10 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
महापालिकेच्या १६५ नगरसेवक जागांसाठी ४१ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. प्रारूप प्रभागरचनेवर आलेल्या ५ हजार ९२२ हरकतींपैकी १ हजार ३२९ हरकती मान्य करण्यात आल्या, तर ६९ हरकती अंशतः मान्य करून बदल करण्यात आले. उर्वरित ४ हजार ५२४ हरकती नामंजूर करण्यात आल्या आहेत. या बदलांमुळे काही प्रभागांच्या हद्दीत मोठे फेरबदल झाले असून, विशेषतः प्रभाग क्रमांक ४ आणि ३८ मध्ये सर्वाधिक बदल झाले ( PMC ) आहेत.
निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे. काहींनी प्रभागात फिरून नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे, तर काही जण आरक्षण निश्चित होईपर्यंत थांबण्याच्या भूमिकेत आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांसारख्या सणांदरम्यान विविध कार्यक्रमांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवरही मतदारांशी संपर्क साधण्यासाठी उमेदवारांकडून नियोजन सुरू( PMC ) आहे.
आरक्षण सोडतीनंतर कोणत्या प्रभागातून कोणत्या प्रवर्गातील उमेदवारांना निवडणूक लढवता येईल, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेसाठी महापालिकेकडून कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू आहे. यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कक्ष स्थापन करण्यात आला असून, यशदा येथील तज्ज्ञांसह विविध प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली ( PMC ) आहे.