मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त गाणी, गोष्टी, कविसंमेलन, अभिवाचन आणि प्रवचनांचा बहारदार संगम
Team My Pune City – “मराठी बोलू कौतुकें, परी अमृतातेहि पैजा जिंके” या ( PMC) संतवचनांचा प्रत्यय देणारा ‘जागर अभिजात मराठीचा’ हा बहारदार सांस्कृतिक सोहळा पुणेकरांच्या मनात घर करून गेला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे महानगरपालिका, सांस्कृतिक केंद्र आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या एकदिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन मा. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते काल ( दि. ३ आॅक्टोबर) बालगंधर्व रंगमंदिरात झाले.
Bandu Andekar : बेकायदा फ्लेक्स प्रकरणी आंदेकर टोळीविरुद्ध दोन गुन्हे दाखल
कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी रोपट्यास जलार्पण करून आणि मराठी भाषेत स्वाक्षरी करून मराठीप्रेमाचा अनोखा संदेश देण्यात आला. मंचावर बालसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते मा. ल. म. कडू, डॉ. संगीता बर्वे, राजीव तांबे, तसेच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर ( PMC)उपस्थित होते.
सकाळचा सत्र – बालसाहित्याचा मेळावा
सकाळी १० वाजता लहान मुलांसाठी खास कार्यक्रम रंगला.
- महाराष्ट्र गीताच्या गजराने सुरुवात ( PMC)
- राज्यभाषा नृत्याने रंगत
- काव्यवाचन व अभिवाचनाने साहित्यिक वातावरण
- मुलांच्या मनोगतांनी मराठीप्रेमाचा उत्स्फूर्त आविष्कार
Nilesh Badhale : बधालेवस्ती येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निलेश बधाले


दुपारचे सत्र – प्रवचनाचा सोहळा
दुपारी १२ वाजता संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मोत्सवानिमित्त ह.भ.प. श्री चैतन्य महाराज लोंढे (कबीरबुवा) यांनी “मराठी बोलु कौतुकें । परी अमृतातेहि पैजा जिंके” या विषयावर प्रेरणादायी प्रवचन दिले. त्यांच्या ओजस्वी वाणीने उपस्थितांना मराठी भाषेचे वैभव आणि अध्यात्मिक गोडी अनुभवायला ( PMC) मिळाली.
गाणी, गोष्टी, कविता, प्रवचन आणि अभिवाचन यांच्या संगमातून ‘जागर अभिजात मराठीचा’ हा उपक्रम पुणेकरांसाठी अविस्मरणीय ठरला. मराठी भाषेच्या अभिजात दर्ज्याचा अभिमान आणि संस्कृतीची समृद्ध परंपरा यांचा संगम या कार्यक्रमातून अनुभवायला ( PMC) मिळाला.