Team My Pune City – शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ( PMC) राखण्यासाठी पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने गेल्या २२ महिन्यांत मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई केली आहे. ऑक्टोबर २०२३ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत १५ क्षेत्रीय कार्यालयांनी मिळून १ लाख १३ हजार २७७ नागरिकांवर कारवाई करत तब्बल ₹७ कोटी ६ लाख ७ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
महापालिकेने स्वच्छता उपविधी तयार करून सार्वजनिक ( PMC) ठिकाणी थुंकणे, लघवी करणे, कचरा जाळणे, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, बांधकाम राडारोडा टाकणे, नदी प्रदूषण, तसेच प्लॅस्टिक वापर यांसारख्या उल्लंघनांवर ₹१८० ते ₹५,००० पर्यंत दंडाची तरतूद केली आहे.
Shri Ambabai : श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
उल्लंघनानुसार कारवाईचा तपशील ( PMC)
- थुंकणे: २,२५७ जणांवर कारवाई; ₹२२.६५ लाख दंड
- लघवी करणे: ११,३३१ जणांवर कारवाई; ₹२२.८० लाख दंड
- कचरा जाळणे: १,४८६ जणांवर कारवाई; ₹१२.२६ लाख दंड
- कचरा वर्गीकरण न करणे: ६,८१७ जणांवर कारवाई; ₹१६.७६ लाख दंड
- सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता: ८५,६९४ जणांवर कारवाई; ₹४ कोटी दंड
- बल्क वेस्ट प्रकल्प बंद ठेवणे: २२२ जणांवर कारवाई; ₹१३.२५ लाख दंड
- बांधकाम राडारोडा टाकणे: १,०६४ जणांवर कारवाई; ₹५६.८६ लाख दंड
- प्लॅस्टिक वापर: २,४०० जणांवर कारवाई; ₹१.२१ कोटी दंड, ९,८७६ किलो प्लॅस्टिक जप्त
Indore Railway Line : इंदोरीवरून जाणाऱ्या नव्या प्रस्तावित रेल्वेमार्गाला वगळण्याची मागणी
महापालिकेचा इशारा
“सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. थुंकणे, अस्वच्छता करणे, कचरा जाळणे यांसारख्या कृती टाळाव्यात; अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल,” असा इशारा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी ( PMC) दिला.