Team MyPuneCity – सिंगापूरमध्ये नोकरी लावतो, असे सांगून ( Pimpri Chichwad Crime News 14 June 2025) एकूण १३.५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी दापोडी येथील ४० वर्षीय संशयित महिलेविरोधात दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २०२३ ते २८ एप्रिल २०२५ या कालावधीत दिघी येथे घडली.
अतुल सुभाष रुणवाल (वय ५१, रा. दिघी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (१३ जून) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अतुल व रवींद्र वाळके यांचा संशयित महिलेने विश्वास संपादन करून त्यांच्याकडून सिंगापूरमध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनुक्रमे ८ लाख व ५.०५ लाख असे एकूण १३.५ लाख रुपये घेतले. मात्र वेळोवेळी टाळाटाळ करत नोकरीही लावली नाही आणि पैसेही परत दिले नाहीत. पोलिस उपनिरीक्षक शंभू रणवरे तपास करीत आहेत.
MP Shrirang Barne : शेकडो कार्यकर्त्यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
दापोडी येथे पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला ( Pimpri Chichwad Crime News 14 June 2025)
पूर्वीच्या वादाच्या कारणावरून दोन इसमांनी एका तरुणास दगडाने डोक्यावर, कपाळावर आणि तोंडावर मारहाण करून गंभीर जखमी केले. दापोडी येथे गुरुवारी (१२ जून) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी एका महिलेने दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शादाब मकसूद शेख, अरबाज मकसूद शेख (रा. आदर्श काॅलनी, पुणे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून संशयितांनी फिर्यादी महिलेचा मुलगा प्रितम महेंद्र यादव (वय २७) याच्यावर हल्ला केला. संशयितांनी संगनमत करून दगडाने त्याच्या डोक्यावर, तोंडावर आणि कपाळावर मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. पोलिस उपनिरीक्षक पंकज महाजन तपास करीत आहेत.
कुरुळी येथे नाशिक-पुणे महामार्गावर रिक्षाच्या धडकेने पादचारी जखमी ( Pimpri Chichwad Crime News 14 June 2025)
भरधाव रिक्षाच्या धडकेने पादचारी गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (१२ जून) सायंकाळी सहाच्या सुमारास गायकवाड वस्ती, कुरुळी येथे नाशिक-पुणे महामार्गावर घडली.
संतोष सुखदेव भोर (३५, रा. मोई-निघोजे रस्ता, निघोजे) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादी हे रस्त्याने पायी जात असताना, रिक्षाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांना गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत.
Dehuroad Crime News : शिवीगाळ करू नको म्हणाल्याने मारहाण
आळंदी येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी ( Pimpri Chichwad Crime News 14 June 2025)
भरधाव कारच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी झाला. आळंदी ते चऱ्होली रस्त्यावर आळंदी येथे ५ जून रोजी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला.
विजय ज्ञानेश्वर कंद्रुप (३६, रा. चऱ्होली) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (१३ जून) आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अंकुश प्रकाश खाडे (रा. चऱ्होली, ता. खेड) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय हे शिरूर येथून आपल्या दुचाकीवरून चऱ्होलीकडे जात होते. त्यावेळी अंकुश खाडे याने त्याच्या ताब्यातील कार भरधाव चालवून फिर्यादी विजय यांच्या दुचाकीला धडक दिली. यात फिर्यादी विजय जखमी झाले. दुचाकीचेही नुकसान झाले. अपघाताची खबर न देता व जखमीस मदत न करता संशयित अंकुश याने घटनास्थळावरून पळ काढला.